संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – भारतीय जनाता पार्टी पक्षाच्या अनुसूचित जमाती सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी राम चव्हाण यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे चंद्रकांत पाटोळे, विजय पाथरे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस बंटी भोसले, विजय चव्हाण, अजय चव्हाण, बाळासाहेब काळे, करन काळे, अक्षय चव्हाण आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.