संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – भगवानगड व ४३ गावाच्या सयुंक्त पाणी पुरवठा शिखर समितीच्या अध्यक्षपदी येळीचे माजी सरपंच संजय बडे पा. यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
पंचायत समितीच्या स्व. गोपिनाथ मुंडे सभागृहात आयोजित आ. मोनिकाताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय बडे यांची निवड करण्यात आली. यावेळी रोजगार हमी योजना, लम्पी आजार व भगवानगड व ४३ गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. आमदार मोनिकाताई राजळे, माजी सभापती सुनिता गोकुळभाऊ दौंड, माणिकराव खेडकर, सुनिल ओव्हळ, विष्णुपंत अकोलकर, एकनाथ आटकर, गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे, तालुकाकृषी अधिकारी सुधीर शिंदे, जिवन प्राधिकरणाचे उपअभियंता ऋणाल दगदगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कौशल राम निरंजन वाघ,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी महेंद्र दराडे, साबाचे उपविभागीय अधिकारी वसंत बडे, शाखा अभियंता आर.एस. आबेंटकर, शरद दहीफळे, अनिल सानप, येळीचे सरपंच संजय बडे, शुभम गाडे,खरवंडीचे सरपंच प्रदीप अंदुरे, नितीन गर्जे, तुकाराम देवढे, संदीप पालवे, सुरेखा राजेंद्र ढाकणे, महादेवराव जायभाये, नितीन किर्तने, विष्णु देशमुख, संदीप पठाडे, चारुदत्त वाघ, माणिकराव बटुळे, कविता गोल्हार, विश्वनाथ थोरे, संजय देशमुख, संजय दौंड, नवनाथ धायतडक, जालिंदर भाबड, जमीर आतार, बाळासाहेब खेडकर, डॉ.शिवाजी किसवे, किशोर दराडे, अरुण मिसाळ, सुरेश बडे, नारायण पालवे व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत तालुक्यात रोजगार हमी योजनेतून वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात व्हावी. ज्या गावात पहिल्यांदा गायगोठे दिलेले नाहीत त्याच गावात प्राधान्याने रोजगार हमीचे गायगोठे द्यावेत. तालुक्यातील आराखडाबाह्य रस्ते आराखड्यात समाविष्ठ करणे. लम्पी आजाराबाबत तातडीने उपाययोजना करणे अशा महत्वाच्या सुचना आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिल्या. भगवनागड व ४३ गावच्या सयुंक्त पाणी पुरवठा शिखर समितीच्या अध्यक्षपदी येळीचे सरपंच संजय बडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते समितीचे नवनियुक्त अध्यक्ष तथा माजी सरपंच संजय बडे यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांनी प्रास्ताविक करुन पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा दिला. सुभाष केकाण यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
भगवानगड व ४३ गावच्या पाणी पुरवठा
👉 भगवानगड व ४३ गावच्या
पाणी पुरवठा योजनेचे कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या कायदेशीरबाबींची पूर्तता सुरु आहे. टेंडर झाले आहे. मान्यता दिलेली आहे. ही योजना पुर्णत्वाला येवुन जनतेला पिण्याचे पाणी तातडीने मिळावे यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. अधिकारी व संबधित गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी यांनी योजनेच्या कामासाठी मदत करावी.
…. नंतर योजनेच्या पाण्याने अंघोळ
👉मला आ. मोनिकाताई राजळे व ३५ गावातील सरपंच बंधुंनी या योजनेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. भगवानगड पाणी योजनेच्या सुरुवातीपासून ते योजनेचे काम पुर्णत्वाला जाईपर्यंत या कामात राहता आले हे भाग्य आहे. आ. मोनिकाताई राजळे यांनी केलेला हा सत्कार मी आनंदाने स्वीकारतो. यानंतर पैठणच्या पाणी योजनेचे पाणी थेट ४३ गावात पोहचेपर्यंत मी कोणताही सत्कार स्विकारणार नाही. योजनेच्या पाण्याचा जलाभिषेक संत भगवानबाबांच्या समाधीला करुन नंतर योजनेच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतरच सत्कार घेईल, असे समितीचे अध्यक्ष संजय बडे यांनी यावेळी जाहीर केले.