संग्राम सत्तेचा वृत्तसेवा (सोमराज बडे)
Online Natwork
पाथर्डी- तालुक्यातील खरवंडी येथे भगवानगड प्रेस क्लबच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार सोहळा हनुमंत महाराज शास्त्री (मिडसांगवी संस्थान) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
भगवानगड प्रेस क्लबच्या वतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार ( नितेश बनसोडे – सावली प्रतिष्ठान अहमदनगर ), भगवानगड परिसर भूषण पुरस्कार संजय फुंदे – ( भगवान प्रतिष्ठाण संस्था पाथर्डी ), आरती केदार – (महिला क्रिकेटपटू पाथर्डी ), रामहरी खेडकर – ( पीएसआय पाथर्डी ), बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता गौरव पुरस्कार कुमार कडलग (दैनिक प्रहार नाशिक), भागवत तावरे ( दैनिक लोकाशा बीड ), नारायण पालवे ( दैनिक सार्वमत पाथर्डी ) आदिंना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदूषण विभागाचे आयुक्त दिलीप खेडकर होते. यावेळी पाथर्डी पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, अहमदनगर भाजपाचे युवानेते तथा उपाध्यक्ष धनंजय बडे पा., बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख विष्णूपंत ढाकणे, राजेंद्र दौंड, मुख्याध्यापक मिथुन डोंगरे, सरपंच सुरेखा ढाकणे, डॉ.राजेंद्र खेडकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसनराव आव्हाड, रशिदभाई तांबोळी, खरवंडी कासार सो.चेरअमन भगवानराव दराडे, उपसरपंच सुनील ढाकणे, सरपंच आजिनाथ दराडे, युवानेते अमोल जायभाय, महादेव पालवे सर आदिंसह मान्य उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
भगवानगड परिसर प्रेस क्लबचे अध्यक्ष व लोकपत्रकार दादासाहेब खेडकर, उपाध्यक्ष अशोक आव्हाड, सचिव विजय शिवगजे ,कोषाध्यक्ष रमेश देवा जोशी, सहसचिव किरण शिरसाठ, कार्याध्यक्ष गणेश बोरुडे, संपर्कप्रमुख जनार्दन बोडखे, प्रसिद्धीप्रमुख भिमराज सुपेकर सदस्य सोमराज बडे, शौकत शेख, गोरक्ष खेडकर आदिंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.