भगवानगडावर दसरा मेळाव्यास शासकीय परवानगी द्यावी ; दसरा मेळावा कृती समितीची मागणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
– राज्यासह देशाच्या कोनाकोप-यात पोहचलेल्या बीड जिल्ह्याच्या सिमेलगत व अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणारा असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणारा भगवानगड हा काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवामुळे‌ पुन्हा चर्चेत आला आहे. भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होणा-या भाविकांसाठी भगवानगडावर दसरा मेळाव्यास शासकीय परवानगी द्यावी, अशी मागणी पाथर्डी तहसीलदार व पोलिस ठाणे यांच्याकडे भगवानगड दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने समितीचे राजाभाऊ दगडखैर, प्रा.सुनिल‌ पाखरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


श्री राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न महायोगी भगवानबाबा यांनी पारंभित केलेला दसरा मेळावा पारंपारिक जागेवर अखंडितपणे सुरु राहावा, यासाठी भगवान बाबांचे असंख्य भक्त व भगवानगड दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने दसरा मेळावा दि.५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या मेळाव्यास शासकीय परवानगी देण्यात यावी. भगवान बाबांच्या भक्तांचा मानसन्मान राखत व पारंपरिक दसरा मेळाव्याची अखंडित पणे चाललेली पार्श्वभूमी पाहता परवानगी द्यावी,‌असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!