ब्युटी पार्लरमध्ये ‘नवरी’चा गोळ्या घालून खून

ब्युटी पार्लरमध्ये ‘नवरी’चा गोळ्या घालून खून
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
झाशी : ‌काही तासात विवाह बंधनात अडकणा-या नवरीचा ब्युटी पार्लरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना रविवारी (दि.२३ जून ) रात्री १० वाजता झाशी येथील सिपरी बाजार येथे घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, त्या मुलीचा काही वेळेतच विवाह होणार होते. तत्पूर्वी ती तयार होण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये गेली हाती. या दरम्यान तिच्या शेजारच्या युवकाने तरुणाने ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तो नवरीला म्हणाला, चल माझ्याबरोबर, त्याला नवरीने नकार दिला. परंतु काही वेळातच, तो युवक ब्युटी पार्लरच्या दरवाजाची काच तोडून थेट पुन्हा आत आला. यावेळी युवक म्हणाला, तू माझी नाहीस तर मी दुसऱ्याची होऊ देणार नाही, असे म्हणत त्याने जलळील पिस्तूल काढून नवरी ‘काजल’ हिच्या छातीत दोन गोळ्या झाडून त्या ठिकाणाहून पळून गेला. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. नवरी काजलचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. तिला झाशीतील मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात येताच डॉक्टरांनी नवरी काजल हीला मृत घोषित केले.
शेजाऱ्यांनी सांगितलेली माहिती अशी की, आरोपी दीपक याचे प्रेम होते. काजल मेकअपसाठी ब्युटी पार्लरमध्ये जाणार हे त्याला माहीत होतं. तो तब्बल 5 तास ब्युटी पार्लरच्या बाहेर फिरत राहिला.
आरोपी दीपक हा वधूच्या शेजारी राहत होता झाशीला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील दतिया येथील राजकुमार अहिरवार यांची मुलगी काजल (वय २०) हिचे रविवारी लग्न होते. शेजारचा तरुण दीपक अहिरवार याला काजल आवडायची. लग्न करायचे होते. पण, काजल आणि तिचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते.
झाशीतील चिरगावच्या सिमथरी गावात राहणाऱ्या राजसोबत काजलचे लग्न कुटुंबीयांनी निश्चित केले. झाशीच्या खोदान येथील निशा गार्डनमध्ये रविवारी हे लग्न होणार होते. रविवारी संध्याकाळीच काजल कुटुंबासह लग्नमंडपात पोहोचली होती.
काजल तिच्या बहिणींसोबत ब्युटी पार्लरमध्ये गेली होती.
काजल संध्याकाळी ५ वाजता तयार होण्यासाठी निशा गार्डनपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये पोहोचली. तिच्यासोबत तिच्या चार चुलत बहिणी नेहा, मुस्कान, वंदना आणि अनुष्का होत्या. नेहा आणि अनुष्काने सांगितले, दीपक रात्री १० वाजता आला. त्याने ब्युटी पार्लरचे गेट उघडून ‘काजल’ हिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. बरोबर चालण्यास सांगितले असता ‘काजल’ हिने नकार दिला. त्यानंतर पार्लर चालवणाऱ्या महिलेने आरोपी दीपक याला बाहेर काढून गेट आतून बंद केले. पण आरोपी दीपक याने ब्युटी पार्लरच्या काचेचा दरवाजा तोडून तो आत आला असे मयत काजल हिच्या बहिण नेहा’ने सांगून ती म्हणाली, बाहेरून दीपकच्या ओरडण्याचा आवाज येत होता. काही वेळाने त्याने दरवाजाची काच फोडली. त्याने आत येऊन तिला धमकावले, यानंतर आरोपी दीपक याने बंदूक काढून नवरी ‘काजल’ हिला गोळी घालताच, नवरी काजल ही खाली पडली. त्यानंतर आम्हालाही जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही खूप घाबरलो होतो. धमकावून तो मित्रासह पळून गेला. आजूबाजूचे लोक तिथे पोहोचले. माहिती मिळताच भावाने घटनास्थळ गाठून जखमी नवरी ‘काजल’ हिला रुग्णालयात नेले.
कुटुंबीय हे घाबरून तिचे ‘झाशी’मध्ये विवाह करत होते. मयत ‘काजल’च्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आरोपी दीपक याने त्यांना यापूर्वीही धमकावले होते. आरोपी दीपक म्हणाला होता की, तो काजलला विवाह करू देणार नाही. त्याच्या भीतीमुळे ते दतियाऐवजी झाशीला आले आणि आपल्या मुलीचे विवाह लावून दिले.
मयत ‘काजल’चे नातेवाईक खोदान, झाशी येथे राहतात. त्यांनीच इथे गेस्ट हाऊसची व्यवस्था केली होती, पण कसेतरी आरोपी दीपक याला याची माहिती मिळाली. रविवारी संध्याकाळी तो मित्रांसह झाशीला पोहोचला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बागेजवळ लोकांनी आरोपी दीपक याला पाहिले.
बहीण नेहाने भास्करला सांगितले की, जेव्हा तिने आरोपी दीपक याला पिस्तुलाने काच फोडताना पाहिले तेव्हा तो गोळीबार करेल हे तिला माहीत नव्हते. कार्यक्रम ठिकाणी रात्रीच सुनसान झाले. नवरी काजल हिला गोळी लागल्याची बातमी विवाह कार्यक्रमात समजताच शोककळा पसरली. कुटुंबीयांनी तातडीने वैद्यकीय महाविद्यालय गाठले. रडल्यामुळे आईची खूप वाईट अवस्था झाली. मयत नवरी काजल ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून चुलत बहिण नेहा हिची प्रकृती बिघडली. अनुष्का व वंदना याही बेशुद्ध पडल्या. त्यांनाही यावेळी रुग्णालयात न्यावे लागले.
पोलिसांची दोन टिम मध्यप्रदेशात रवाना झाल्या.
याबाबत एसएसपी राजेश एस म्हणाले की, विवाहच्या काही अगोदर नवरी काजल हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या लोकांचा पाठलाग करत आरोपी दीपक हा झाशी या ठिकाणी आला होता. आरोपी दीपक याला पकडण्यासाठी पोलिसांच्या दोन टिम दतिया येथे रवाना झाल्या आहेत. केवळ घरावरच नव्हे तर त्याचे नातेवाईक असलेल्या ठिकाणीही छापे टाकण्यात येत आहेत. आरोपी दीपक या युवकाला लवकरच अटक करण्यात येईल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!