बोल्हेगावं -नागापूरला डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी 

बोल्हेगावं -नागापूर ला डॉ सुजय विखे यांची प्रचार फेरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पा. यांच्या प्रचारार्थ युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे यांच्या पुढाकारातून बोल्हेगावं -नागापूर परिसरातून प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी अभय आगरकर, दत्ता पाटील सप्रे, लोभाशेठ कातोरे, शरद बारस्कर, बबनराव कातोरे, नगरसेवक रामदास आंधळे, योगेश गलांडे,सचिन कुसळकर, विवेक नाईक, किशोर वाकळे,प्रदीप परदेशी, प्रशांत मुथ्था, गोपाळ वर्मा,सचिन पारखी,निशांत दातीर,उमेश साठे,बाळासाहेब भुजबळ, अनिल शिंदे, प्रिया जानवे,अनिता दिघे आदिंसह महायुतीचे पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.


प्रचार फेरीस गणेश चौक येथील गणपती मंदिरापासून सुरुवात करण्यात आली गणेश चौक,कातोरे वस्ती,आदेश लॉन,भारत बेकरी, आंबेडकर चौक,चैतन्य क्लासिक,शिर्डीरोड पार करून नागपूर गावात गेली. तिथे फिरून पुन्हा गणेश चौक येथे येऊन सांगता झाली.
या परिसरातील सर्व घरे व दुकाने येथे कार्यकर्त्यांनी खा. विखेंना निवडून देण्याचे आवाहन केले. फेरीत भारतीय जनता पार्टी,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष, घटक पक्षाचे नगर शहर,एमआयडीसीतील सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!