बेलवंडी पोलिस ठाणे : डांबून ठेवून वेठबिगारी करून घेणा-यांना पकडले ; परप्रांतीय तिघांची सुटका

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बेलवंडी :
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत काही लोकांना डांबून ठेवून वेठबिगारी करून घेणा-यांना पकडले असून, त्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ओलीस ठेवलेल्या परप्रांतीय तिघांची बेलवंडी पोलिसांनी सुटका करून चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी अजित पाटील, कर्जत डिवायएसपी अण्णासाहेब जाधव, अहमदनगर अर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मागदर्शनाखाली बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार पोसई राजेंद्र चाटे, सफौ रावसाहेब शिंदे, सफौ मारुती कोळपे, पोहेकॉ. अजिनाथ खेडकर, पोहेकॉ.ज्ञानेश्वर पठारे, चापोहेकॉ.भाऊ शिंदे, पोना शरद कदम, पोना शरद गागंर्डे, पोना पठारे नंदु, पोना संतोष धांडे, पोकॉ. विनोद पवार, पोकॉ, कैलास शिपनकर, पोकॉ. संदिप दिवटे, पोकॉ. सतिष शिंदे, पोकॉ,सचिन पठारे, चापोकॉ. सोनवणे, मपोना सुरेखा वलवे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात दि.३ एप्रिल २०२३ रोजी ढवळगाव शिवारात एक अनोळखी विहिरीत मयत अवस्थेत मिळून आल्याने बेलवंडी पोलिस ठाण्यात आ.म.र नं- ३३/२०२३ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोनि संजय ठेगें यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा तालुक्यात काही इसमांच्या टोळया हे मानवी तस्करी करुन त्यांना डांबुन ठेवुन मारहाण करतात व वेठबिगारी प्रथा कायदयाने बंद असताना वेठबिगार म्हणुन त्यांचेकडुन घरचे व शेतातील काम करुन घेतात व त्यांचेकडुन विविध रेल्वेस्टेशनवर भिक मागवुन घेतात, असे मयत झाल्यानंतर त्यांना पाण्यात किंवा इतरत्र बेवारस टाकून देतात. तसेच काही इसम विटभटयांवर तथा बागांमध्ये वेठबिगार म्हणून कामास ठेवले आहेत,अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोनि संजय देंगे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची ३ स्वतंत्र पथके तयार करून ती बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत रवाना केली. या तपासात श्रीगोंदा तालुक्यातील शेंडगेवस्ती, खरातवाडी येथे पिलाजी कैलास भासले (रा. शेंडगेवस्ती खरातवाडी) याचेकडे सलमान ऊर्फ करणकुमार (रा. आत्मजनेहरु वार्ड नं ७ ग्रामपंचायत जेवरा जंजीरगीर पंचा भैसा छत्तीसगड) हा मिळून आला. त्याची त्यांच्या तावडीतून सुटका करुन पिलाजी कैलास भासले याच्याविरुदध बेलवंडी पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं. १६९ /२०२३ भा.द.वि. कलम- ,३६७,३४२,३२३,५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास सफौ. आर. टी. शिंदे हे करत आहेत.

👉 घोटवी (ता. श्रीगोंदा) शिवारात बोडके मळा येथे अमोल गिरीराज भोसले (रा. बोडकेमळा, घोटवी शिवार) याच्याकडेस ललन सुखदेव चोपाल (रा. वारी ता. दरभंगा जि.समस्तीपुर राज्य बिहार) हा मिळून आल्याने त्याची त्याच्या तावडीतून सुटका केली. अमोल गिरीराज भोसले याच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं. १७१ / २०२३ भा.द.वि. कलम-, ३६७, ३४२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोहेकॉ. खेडकर हे करत आहेत.

👇घोटवी (ता. श्रीगोंदा) शिवारात पाचपुते हायस्कुल जवळ अशोक दाउद भोसले, जंग्या गफुर काळे (रा. घोटवी) यांच्याकडे भाऊ हरिभाऊ मोरे (रा. चोनई ता.अंबेजोगाई जि.बीड) हा मिळून आल्याने त्याची त्यांच्या तावडीतून सुटका केली. अशोक दाउद भोसले, जंग्या गफुर काळे या दोघांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं. १७२ / २०२३ भा.द.वि. कलम-, ३६७, ३४२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपी अटक केली.
तपास दरम्यान त्यांनी यापूर्वी एकास मारुती गबुलाल चव्हास यास ५ हजार रुपयास विकले असल्याबाबत सांगितले. सुरोडी शिवारात जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी शव श्रीशिव (रा. कर्नाटक) हा मिळून आल्याने त्याची सुटका करण्यात आली आहे. अधिक तपास पो.ना. पटारे हे करत आहेत.
👉बेलवंडी पोलीसांचे आवाहन
श्रीगोंदा तालुक्यातील व बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत वेठबिगार प्रथा ही कायद्याने बंद असल्याने अशा प्रकारे कोणी मानवी तस्करी करुन अनोळखी इसमांना डांबून ठेवून घरातील तसेच शेतातील काम करण्यास भाग पाडत असेल, व त्यांच्या मार्फतीने भिक मागवत असतील.. तर संपर्क साधावा. विटभट्टी मालक, बागायदार, हॉटेल चालक, गॅरेजवाले तसेच इतर आस्थापना चालक यांच्याकडे परप्रांतीय किंवा परजिल्ह्यातील मजुर कामावर असल्यास त्यांचे ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकॉर्ड) याची माहिती आपणाकडे ठेवावी. त्यांच्या मुळ गावी त्यांचे पूर्व चारीत्र्याबाबत खात्री करुन मजुरांबाबत कामगार आयुक्तांना माहिती पुरवावी.
संपर्कासाठी 📥 पो.नि.संजय ठेंगे:-८४८३०३८९५३, पो.स. ई. राजेंद्र चाटे:- ९१६८४५३४२३ बेलवंडी पोलीस स्टेशन फोन नं- ०२४८७-२५०२३३ श्रीगोंदा पोलीस स्टेशन फोन नं-०२४८७-२२२३३३
पोलीस निरिक्षक बेलवंडी पोलीस स्टेशन ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!