संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील मालाड येथील बेकरीवर छापा मारला आहे. या छाप्यादरम्यान बेकरीत केक आणि पेस्ट्रीमध्ये ड्रग्ज विकले जात असल्याचे उघडकीस आले. बेकरीच्या माध्यमातून ड्रग्सरॅकेट उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
एनसीबी अधिकार्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकार्यांनी कारवाई केली. अधिकार्यांनी संबंधित बेकरीत थेट छापा टाकला. यावेळी एका डब्ब्यात अधिकार्यांना 160 ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचार्यांची चौकशी केली तेव्हा सर्व प्रकार उघड झाला.
संबंधित बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. एनसीबी अधिकार्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतले. तसेच बेकरीतील तिघांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास अधिकारी करत आहेत. तसेच या कारवाईतून ड्रग्ज माफियांच्या आणखी मोठ्या जाळ्याचा भंडाफोड होण्याचा अंदाज आहे.