संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे तुळजापुरच्या पालखीचे तिसऱ्या माळेला आगमन झाले. सकाळी ८ वा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी सपत्नीक पालखीची आरती महापूजा केली.
यावेळी मंदिराचे पुजारी ॲड विजय भगत, ॲड अभिषेक भगत, अमोल जाधव, रोहिदास कर्डीले, देविदास कर्डीले, राजेंद्र भगत , किरण भगत ,सुभाष भगत, अंजिक्य भगत, कुणाल भगत, रोहन भगत, संकेत भगत , वेद भगत , अंजिनाथ कर्डीले, अनिल गुंजाळ, राजेंद्र कर्डीले हे उपस्थित होते. दर्शन रांगेसाठी माहिला, पुरुषासाठी स्वंतत्र दर्शन रांग करण्यात आली आहे. सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. दुपारी १२ वाजता पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी घरासमोर सडा-रांगोळी काढली. प्रत्येक घरोघरी पालखीची पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात होता.