संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- सगळीकडे माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे.आपल्याला खाजगी कंपन्यांबरोबर स्पर्धा करायचे आहेत. यामुळे विचार करून भविष्यामध्ये आपल्याला त्या दृष्टीने जावे लागेल म्हणून देशभरामध्ये बीएसएनएल ही संस्था काम करेल, या संस्थेचे खासगीकरण केले जाणार नाही व ती बंदही होणार नाहीत, अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण व दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली
अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर आले असता ते बोलत होते यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर ,शहराध्यक्ष भैय्या गंधे, उपाध्यक्ष सचिन पारखी, तुषार पोटे आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री धोत्रे म्हणाले की आज माहिती तंत्रज्ञान मध्ये मोठा बदल होत चाललेला आहे. अनेक खाजगी कंपन्या यामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे सरकारी कंपन्यांचा टिकाव हा लागला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, बदलाच्या काळामध्ये बीएसएनएल मध्ये आम्ही स्वेच्छानिवृत्ती योजना आखली होती करोनाचा काळ आल्यामुळे अनेक समस्या त्यामध्ये निर्माण झाल्या होत्या. भविष्यामध्ये बीएसएनएल चे जाळे मोठे करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आम्ही विचार करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये बीएसएनएलचे खासगीकरण आम्ही करणार नाही तसेच ती संस्था बंद केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आता फोर जी सुविधा आलेली आहे व बीएसएनएल सुद्धा का ही सुविधा सुरू करणार असून त्याचे टेंडर निश्चित करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
ट्विटर फेसबुक यासारख्या विविध सुविधा सध्या माहित तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध झालेल्या आहेत,त्याचा वापर सुधा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे, त्याचा माहितीचा सगळ्याचा उपयोग चांगल्यासाठी होतो तसा त्याचा वाईट गोष्टीसाठी सुद्धा केला जातो, ही सुद्धा बाब गंभीर आहे म्हणून केंद्र शासनाने अशांवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे ते निर्बंध म्हणजे संबंधित कंपनीने जी काही सरकारला माहिती लागते ती त्याने देणे बंधनकारक असले पाहिजे तसेच अनेकांचे कार्यालय हे हिंदुस्थानामध्ये नाहीत ते सुद्धा त्यांनी याठिकाणी सुरू केले पाहिजे अशी या मागची भूमिका आहे असे ही मंत्री धोत्रे म्हणाले.
👉परीक्षा निर्णय 1 जूनला
बारावी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा घ्याव्यात की नाहीत, या दृष्टिकोनातून चर्चा सर्वांशीच केली होती. प्रत्येक राज्यांमध्ये संबंधित सरकारशी व त्या डिपाटर्मंटशी ऑनलाइन पद्धतीने बोलणीही झालेली आहे. यामध्ये दोन पर्याय सुचविण्यात आले असून जे महत्त्वाचे विषय आहेत. त्यांची 3 तासाच्या ऐवजी दीड तास परीक्षा घ्यायची व प्रत्येक शाळेतील केंद्रामध्ये बसण्याची व्यवस्था करायची असा निर्णय घेतलेला आहे, असेही मंत्री धोत्रे यांनी सांगितले.
सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे या विषया संदर्भात मध्ये विचारले असता मागच्या भाजप सरकारने हा कायदा आणण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाने सध्या याला स्थगिती दिलेली आहे आता कोणता पक्ष सरकार आहे,असा विषय न करता राज्य सरकारने सर्वांना बरोबर घेऊन हा विषय सोडवला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.