बाळासाहेब नाहाटा यांचा अ.नगर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे अहमदनगर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी राजीनामा दिला आहे. पार्टीचे प्रांतध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे हा राजीनामा दिला आहे.
अहमदनगर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद हे रिक्त झाले आहे. यामुळे आता या पदावर नगर दक्षिण जिल्ह्यातील कोणाची वर्णी लागली जाते, याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे.
बाळासाहेब नाहाटा यांनी राजीनाम्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मला महाराष्ट्र राज्य बाजार माहिती महासंघाचे अध्यक्ष पद दिले. महाराष्ट्रातील ३२२ मार्केट कमिटीचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. राज्याच्या कृषी आणि पणन मंडळावर संचालक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्याबरोबर मला अहमदनगर दक्षिण जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. असे असतानाच मला धुळे जिल्हाचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे धुळे जिल्ह्याचे निरीक्षकपद दिले. त्यामुळे एकाच वेळी एवढ्या पदावर काम करणे शक्य नसल्याने अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा मी राजीनामा देत आहे, त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.