👉मिरी पांढरीपूल रस्त्यावरील खोसपुरीत ट्रकपकडून साडेसहा लाखाचा रेशनिंगचा तांदुळ पकडला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – जिल्ह्यातील नगर तालुक्यातील मिरी ते पांढरीपूल रस्त्यावरील खोसपुरी बसस्थानकाजवळ रेशनचा तांदुळ काळ्याबाजाराने विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक (एमएच २३ एयु ७९२१) पकडण्याची कारवाई जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी (दि.१३) पहाटेच्या साडेपाच वाजता कारवाई केली आहे. रेशनचा मोठ्याप्रमाणात काळाबाजार सुरू आहे, यावर कारवाई व्हावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे पाथर्डी तालुका प्रमुख विष्णू ढाकणे, भाजपाचे प्रा.सुनिल पाखरे व आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी केली होती. यानंतरही याची दखल घेत, खा सुजय विखे पा.यांनीही महसूलमंत्र्याच्या हा प्रकार लक्षात आणून कारवाई निश्चितच होईल, असं आश्वासनही दिले होते. यानंतर अहमदनगर जिल्हा पुरवठा विभाग खडबडून जागा झाल्याने ही पहिलीच कारवाई झाली आहे.
या कारवाईत अशोक उध्दव पवार (रा. अंमळनेर भांडयाचे, ता. पाटोदा, जि. बीड), सुनील कठाळे (रा. दहीवडी, ता. शिरुर कासार, जि. बीड), गोकुळ महादेव जाधव (रा. आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३व ७४ कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी (दि.१३) ५.३० वाजण्याच्या सुमारास मिरी (ता. पाथर्डी) कडुन पांढरीपुलाकडे येणा-या दिशेने एक ट्रक आला. ट्रकचा लाईटचे उजेडा मध्ये क्रमांक पाहीला (एमएच. २३ ए.यु. ७९२१) असा असल्याचे दिसले. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक असल्याने पुरवठा विभागाच्या पथकाने ट्रकला हात दाखवून थांबवण्यास सांगितले. परंतु ट्रक चालकाने ट्रक रोडकडेला थांबविला. यानंतर आम्ही सर्व अधिका-यांनी ट्रक चालकास पथकातील अधिकारी यांनी ओळख सांगून ट्रकमध्ये असलेल्या मालाची पाहणी करण्याचा उद्देश सांगितला. त्यास त्याचे नांव पत्ता विचारला त्यावर त्याने त्याचे नांव गोकुळ महादेव जाधव (वय 22 , चालक, रा. आर्वी, ता. शिरुर कासार, जि. बीड असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पंचांचे समक्ष ट्रकचा पाठीमागील बाजुची ताडपत्री काढून पाहीले असता, त्यामध्ये तांदळाच्या गोण्या असल्याचे दिसून आल्या. काही गोण्यांची पाहणी केली असता पांढ-या गोण्यामध्ये रेशनिंगचा तांदुळ असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाला संशय आला. तांदुळ कोठून कोणाकडून आणला. याबाबत चालक गोकुळ जाधव यास विचारले. त्याने माल हा अशोक उध्दव पवार (रा अंमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) यांच्या मालकीचे अंमळनेर भांडयाचे गावातील खाजगी गोडावूनमधून अंदाजे 33 मेट्रीक टन तांदुळ या ट्रकमध्ये भरून तो गुजरात येथे जात आहे. ट्रक माझ्या ताब्यात मालक अशोक पवार (रा. अंमळनेर ता.पाटोदा जि.बीड) व त्यांचे सहकारी सुनील कठाळे (रा. दहीवंडी, ता. शिरुर कासार जि. बीड) या दोघांनी धामनगाव ( ता. आष्टी, जि. बीड) येथे असलेल्या धामनेश्वर इंडीयन ऑईल .चा पेट्रोलपंपाजवळ दिला. मला गुजरात येथे खाली करण्यास सांगितला आहे. त्यानंतर आम्ही सूर्य अधिकारी व पंचांचेसमोर चालक गोकुळ महादेव जाधव यास ट्रकमध्ये असलेल्या माल याबाबत पुरेशी माहीती देता आली नाही. तो उड़वा उडवीची उत्तरे देवू लागला. त्याच्याकडे वाहनातील मालाचे कोणतेही मुळ कागदपत्र आढळून आले नाही. काही वेळाने त्याचा मोबाईलचे व्हाट्स अँपवर मालाचे बिलाची पावती आल्याचे त्याने आम्हाला दाखविले. बिल हे पकडलेल्या ट्रकचे असल्याचे दिसून आले. परंतु त्या बिलाचा व ट्रकमध्ये असलेल्या तांदळाचा आम्हाला संशय आला. मिळून आलेल्या ट्रकमध्ये असलेला माल रेशनचा असून तो दुसऱ्या गोण्यामध्ये भरून त्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करत असल्याची पुरवठा अधिकारी पथकाला व पंचांची खात्री झाली. मिळून आलेल्या मालाचे याप्रमाणे. १ लाख २५ हजार रु. किंमतीचा १४ टायर ट्रक ( एमएच २३ एयु ७९२१) असा असलेला जुना वापरता किंमत अंदाजे., ६ लाख ५० हजार रू किंमतीचा ३३ टन रेशनींगचा तांदुळ किंमत व वजन अंदाजे, असा एकूण ३१ लाख ५० हजार मुद्देमाल ताब्यात घेतला. चालकचा पंचांचे व जिल्हा पुरवठा अधिकार कार्यालय पथकातील अधीका-यांचे समक्ष जबाब व तांदळाचा पंचनामा केला.
रेशनचा तांदुळ दुसऱ्यां गोण्यांमध्ये भरुन त्याची बेकायदेशीररित्या वाहतुक करतांना मिळून अशोक उध्दव पवार, सुनील कठाळे, गोकुळ महादेव जाधव यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७४ कायद्याप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय पुरवठा निरीक्षक शिवराज पवार यांच्या फिर्यादीवरुन अहमदनगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.