संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुरबाड – बारवी धरण व मुरबाड नदीतील मासे शासकीय संशोधनासाठी 6 ऑगस्ट रोजी तपासणीला गेले होते. सफेद धाग्याच्या आकाराचे जंतु माश्यांच्या शरीरात घर करुन राहत असल्याचे आढळले होते, त्यामुळे मासे खाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
परंतु आता 13 ऑगस्ट रोजी आलेल्या रिपोर्ट प्रमाणे बारवी धरण व मुरबाड नदीतील ते मासे खाण्यास काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित शिजवून ते मासे खावेत, मास्यामध्ये आढळून येणारे पैरासाइट्स परजीवी ह्याच पाण्यातिल जीवांमधुन येत आहेत, ते काही मास्यामध्ये आढळत आहेत तर काही मास्यामध्ये नाहीत, अश्या प्रकारची क्लीनचिट रिपोर्ट सबंधित विभागातर्फे देण्यात आली आहे.
दि. 6 ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीनुसार 1 कोटी लोकांची तहान भागवणारे बारवी धरण व मुरबाड नदीतील गोड्या पाण्यातील मासे हे गेली दोन वर्षांपासून एका वेगळ्याच जंतु संसर्ग प्रादुर्भावाने ग्रस्त असल्याने अनेक माशांमध्ये जवळजवळ 4 ते 6 इंच लांबीचे व रंगाने लाल, सफेद धाग्याच्या आकाराचे जंतु या माश्यांच्या शरीरात घर करुन राहत असल्याचे आढळून आल्याने मासे खाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गोड्या पाण्यातील मासे विक्रीवरुन त्यामुळे मासे विक्रेते व ग्राहकांत नेहमी वाद निर्माण होत होते. त्यामुळे गरीब मासे विक्रेता हा हतबल झाला होता. या जंतूंचे निदान, योग्य विल्हेवाट व नाश होण्यासाठी सरकारी यंत्रणा व फिशरीज संस्थेशी सतत संपर्क व पाठपुरावा करुन येथील समाजसेवक नदीमित्र अनिल सकट व पत्रकार बाळासाहेब भालेराव यानी अनेक संबधित अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केल्या नंतर आनंद पालव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ठाणे -पालघर विभाग यांच्या सूचनेनुसार 6 ऑगस्ट 2021 रोजी मत्स्य विभागातील अधिकारी क्रुणाली तांडेल सहाय्यक मत्स्य व्यावसायिक विकास अधिकारी, अजिंक्य देवकते मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यानी प्रत्यक्षात बारवी धरणातील मासेमारीच्या जागेवर जावून विविध प्रकारच्या माशांचे ताजे नमूने पुढील तपासणी साठी व निरिक्षणासाठी मत्स्य जीव शास्रज्ञ यांच्याकड़े पाठवून दिले होते.
त्या संदर्भात आता हाती आलेल्या रिपोर्ट प्रमाणे बारवी धरण व मुरबाड नदीतील ते मासे खाण्यास काही प्रॉब्लेम नाही, रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा स्थानिका कडून असे सांगणे आहे की सदर जंतु किंवा पैरासाइट्स हे मास्याच्या फ़क्त पोटात नसुन सम्पुर्ण शरीरात घुसले आहेत, व ते पाहण्यासाठी सुद्धा किळसवाणे वाटत आहेत, रिपोर्ट मध्ये मास्याची विदेशी नावे लिहिली गेलेली आढळून येत आहेत, विदेशी मासे पाण्यात आले कसे??? असा प्रश्न उपस्थित होत आहे, सदर प्रकरणाची अजुन सखोल चौकशी व्हावी, दशकांपासुन बारवी धरणाच्या पायथ्याशी जमा झालेले मल व गाळ स्वच्छ करण्यात यावे, बारवी धरण व्यवस्थापना द्वारे वेळोवेळी या पाण्याची तपासणी करावी अशीही मागणी होत आहे.
संकलन: बाळासाहेब भालेराव