👉अधिकारी पदाधिकारी नागरिकांच्या उपस्थित
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
लोहगाव : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे माहिती अधिकार संघर्ष समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करून शिवजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला.
तुतारी वादन, भारावलेले वातावरण, पोवाराजुरीड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन भगवे ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर प्रेम अभिमान व्यक्त करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही माहिती अधिकार संघर्ष समिती व शिवप्रेमींनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय कोल्हे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहात्याचे उपअभियंता श्रीनिवास वर्पे, बांधकाम विभागाचे पाटोदाचे उपअभियंता संजय साबळे, पोलीस निरीक्षक समाधान पाटील, मंडळअधिकारी श्रीमती बबिता लहारे, कामगार तलाठी भाग्यश्री शिंदे, ग्रामविकास अधिकारी दिलीप कराळे, प्रवरा बँकेचे श्रीधर गोरे, तुकाराम बेंद्रे, आण्णासाहेब बेंद्रे, बाबासाहेब म्हस्के, अमृत मोकाशी, भाऊसाहेब चेचरे, प्रसाद म्हसे, पत्रकार सीताराम चांडे पत्रकार कोंडीराम नेहे राजेंद्र बोडखे राहुल डहाळे, प्रमोद बनसोडे, अॅड भास्कर पठारे, अॅड प्रकाश बेंद्रे, अॅड राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे भिमराज कुदळे, राजू मकासरे, उदय ताराळकर, दादा देशमुख अजित ब्राम्हणे, राजू भालेराव, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब भालेराव, संजय घोगरे, गणेश घोगरे, बापू भोसले, गणेश सचदेव, जावेद पठाण, जावेद शेख, शरद तांबे, रामसिंग पंजाबी, दीपक म्हसे, प्रकाश आहेर, विकास त्रिभुवन, शंकर रोकडे, राजू मोकाशी, शरद चेचरे, पप्पू गाढवे, भाऊसाहेब धनवटे, राहुल हुंडेकरी, सुधीर वाकचौरे, कोंडीराम नेहे आदींनी परिश्रम घेतले. असून सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरखदादा गवारे यांनी केले.