संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः बलात्कार, पोक्सो आणि अॅट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीस उच्च न्यायालयात नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. फिर्यादी हिने आरोपी याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात भादवि.कलम 376 (2), 342,354, 354-अ, 354-ड, 323,504, 506,507, पोक्सो कलम 3,4,8,12 व अॅट्रोसिटी कायदा कलम 3 (1)(थ)(ळ), 3(1) थ(ळळ), 3(1)(5),3(2) र्(ींर) अनन्वे दि.2 एप्रिल2024 गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याची माहिती अशी की, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहत होते. त्यामुळे सन 2023 मध्ये आरोपी याने फिर्यादी हिचे इंस्टाग्राम आयडीवर मेसेज पाठवून तिच्याशी मैत्री करण्यासाठी बोलू लागला व नंतर दोघांचे बोलणे सुरु झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी हिस भेटण्यासाठी बोलावले. तिच्या संमती शिवाय दोघांचे मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले. सन 2024 मध्ये आरोपी याने फिर्यादी हिस भेटायला बोलावले व धमकी दिली ‘जर तू नाही आलीस तर आपले फोटो वायरल करेल, त्यामुळे घाबरून फिर्यादी ही आरोपीस भेटायला गेली. आरोपीने तिच्यावर बळजबरीने बलत्कार केला. घटना ही फिर्यादीने तिच्या आईवडिलांना सांगितली. त्यांनतर फिर्यादीने आरोपीच्या विरोधात कलमाअंतर्गत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगरमध्ये आरोपीच्या विरोधात दोषारोप दाखल केले. त्यानंतर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय येथे नियमित जामीन अर्ज दाखल केला. जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे नियमित जामीन अर्ज दाखल केला. अर्जामध्ये अर्जदार यांचे वकील अॅड. सुधीर आर झांबरे यांनी युक्तिवाद केला की, आरोपीला गुन्ह्यामध्ये राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलेले आहे.
दोषारोप पत्रामध्ये आरोपीच्या विरोधात आवश्यक ते पुरावे नाहीत आणि सदर केस दाखल करताना विलंब झालेला आहे. आरोपीच्या विरोधात खोटी केस दाखल केलेली आहे, त्यामुळे आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर दि.9 एप्रिल2025 रोजी उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.आरोपीच्या वतीने अॅड. सुधीर आर झांबरे यांनी काम पाहिले.