बलात्कारसाठी वापरलेल्या हॉटेल मालकास अटक ; राहुरी पोलीसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहुरी : अल्पवयीन मुलीच्या अपहरण करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यासाठी वापरलेल्या हॉटेल मालकास अटक करण्याची कारवाई राहुरी पोलीसांनी केली आहे. हॉटेल मैत्री पार्कचा हॉटेल मालक आरोपी रवींद्र योसेफ जाधव असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर डिवायएसपी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार पोउपनि एस आर फडोळ, पोकाॅ रवींद्र कांबळे , पोना अमोल गायकवाड यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२० जानेवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथून आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याने अल्पवयीन मुलीस माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण पळून जाऊन लग्न करू तू माझ्यासोबत आली नाही तर मी तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारून टाकीन, असा दम दिल्याने ती अल्पवयीन मुलगी दुचाकीवर बसून गुहा येथील मैत्री हॉटेल येथे घेऊन गेला. हॉटेलचालकानेही अल्पवयीन मुलीच्या वयाची खातर जमा न करता आरोपीस व अल्पवयीन मुलीस हॉटेलच्या खोलीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिला अहमदनगर येथे दुचाकीने घेऊन गेला. तिथून एका चार चाकी वाहनाने अहमदनगर ते बीड या अज्ञात ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर याबाबत पीडितेच्या घरच्यांना माहिती मिळाल्याने पीडीतीच्या नातेवाईकांनी तिला घरी आणल्यानंतर याबाबत माहिती दिल्याने राहुरी पोलीस ठाण्यात गुरन ६०/२४ भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३६३, ३६६, ३७६ (२) बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यांमध्ये आरोपी शुभम राजेंद्र सत्रे यास दि.२२ जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली. त्याची दि.२७ जानेवारी २०२४ रोजीपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती.
तसेच गुहा येथील हॉटेल मैत्री पार्कचा हॉटेल मालक आरोपी रवींद्र योसेफ जाधव यास दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली. त्याला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.
राहुरी पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा, म्हणून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना व लॉजिंग मालकांना भारतीय दंड विधान संहिता कलम १४९अन्वये नोटीस देण्यात आलेली आहे की, कुणीही अल्पवयीन मुलींस /घेऊन येणाऱ्या व्यक्तीस हॉटेल लॉज वापरण्याकरिता तसेच सज्ञान व्यक्तींचे ओळखपत्र व मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल लॉजिसमध्ये प्रवेश देणार नाही अन्यथा प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सर्वसामान्य आव्हान करण्यात येते की अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजिस उपलब्ध करून दिल्या जात असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास पोलीसांना माहिती कळवावी, नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांनी केले आहे.