संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन त्या बदल्यात महिलांकडे सोन्याची चैन अथवा मंगळसूत्र मागणी करून ते काढून घेऊन फसवणूक करणार्यास कोतवाली पोलीसांनी पकडले. संतोष मोहनराव चिंतामणी (रा.राजगुरुनगर पेठ ता.जि बीड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार डिबीचे पोसई महेश शिंदे, पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, विशाल दळवी, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, सलीम शेख, दशरथ थोरात, संभाजी कोतकर, पोना अविनाश वाघचौरे, अभय कदम, अमोल गाढे, सतिश शिंदे, अतुल काजळे, मपोना वर्षा पंडीत, मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडू आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक रोडला जात असताना एकाजणाचे सोन्याचे बिस्कीट रोडला पडल्याचे भासवून ते दुस-यास सापडल्याचा बहाना केल्या. तेच सोन्याचे बिस्कीट तुम्हाला देतो, कोणाला काही सांगू नका, पण मला या बदल्यात तुमची सोन्याची चैन द्या. हे सोन्याचे बिस्कीट तुम्हाला राहू द्या, असे सांगून पिवळे धातूचा तुकडा देऊन फसवणूक केली आहे, या सुमन केशव खोजे (रा.धनगरगल्ली भिंगार, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं 953/2024 बीएनएस 2023 चे कलम 318(4), 316(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दाखल गुन्ह्याचा तपास करत असतांना पोनि श्री.दराडे यांनी तात्काळ डिबी टिमला गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणावा, अशा सूचना दिल्या. फिर्यादीकडे सखोल चौकशी करुन आरोपीचे वर्णन घेतले असता त्याने अंगात पांढरा शर्ट, काळे रंगाची पँन्ट तसेच पायात चप्पल डोक्यात टोपी घातलेली आहे. तो गुन्हा करुन नगर कॉलेज रोडला पायी चालत गेला आहे, अशी माहीती मिळाल्याने त्या वर्णनाच्या इसम डिबी टिमने परिसरात जाऊन शोध घेतला. दरम्यान चांदणी चौक येथे तो इसम हा प्रवासी गाडीची वाट पाहत असल्याचे व त्याची हालचाल संशयीत जाणवल्याने त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी करता त्याने त्याचे नाव संतोष मोहनराव चिंतामणी (रा.राजगुरुनगरपेठ ता.जि बीड) असे सांगितले. त्याने माळीवाडा येथे महिलेला फसवणूक करुन लुबाडल्याचे सांगितले. त्याच्याकडून 1 तोळा वजनाची सोन्याची चैन हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडे कोतवाली ठाण्यात गुरनं 598/2024 भादवि 420 या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडविची उत्तरे दिली. पोलीसीखाक्या दाखवताच त्याचे यापूर्वी माळीवाडा येथून एका महिलेला पंतप्रधान योजनेचे पैसे काढून देतो, असे सांगून तिच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र काढून घेतलेची कबुली दिली. त्याच्याकडून एकुण अंदाजे 1.75 तोळे वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.