‘बकरी ईद सणा’च्या दिवशी अहमदनगर -पुणे मार्गावरील वाहतुकीत बदल

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
मुस्लिम बांधवांच्या ‘बकरी ईद’ या सणाच्या रविवार, १० जूलै रोजी ‘कोठला ईदगाह’ मैदानावर नमाज होणार आहे. हे मैदान हे अहमदनगर – पुणे महामार्गालगत आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये. यासाठी येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.


अहमदनगर – पुणे मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश आवाज, हॉर्न यामुळे नमाज पठणात व्यत्यय येतो. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये आणि कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) नुसार १० जूलै २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत येथील वाहतूक वळविण्यात आली आहे.
औरंगाबाद रोड कडून येणारी जड व इतर सर्व प्रकारची चारचाकी वाहने एसपीओ चौक, न्यायनगर मार्गे, बेलेश्वर चौक, किल्ला चौक, जीपीओ चौक, चांदणी चौक मार्गे वळविण्यात आली आहेत. पुणे रोडकडून येणारी जड व इतर सर्व प्रकारची वाहने जीपीओ चौक, किल्ला चौक, बेलेश्वर चौक, न्याय नगर मार्गे, एसपीओ चौकाकडे वळविण्यात आली आहेत. असेही मनोज पाटील यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!