प्रा.शैलेश जाधव यांचा पी.एचडी पदवी मिळविल्याबद्दल सत्कार


👉समाज घडविण्यात शिक्षकाची भुमिका मोलाची- नंदकुमार झावरे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
पारनेर ही हुशार विद्यार्थ्यांची खाण आहे, पारनेर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी युपीएससी, एमपीएससी, सैनिकी, शिक्षण, क्रीडा आदिंसह शेतीसह विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने पारनेरचे नाव देशभर गाजवले आहे. योग्य मार्गदर्शन आणि जिद्द, मेहनतीच्या जोरावर यश मिळवत आहेत. शैलेश जाधव यांनीही गणित विषयात पी.एचडी मिळवत या लौकिकात भर घातली आहे. प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम ते करत आहे. चांगला समाज घडविण्यात शिक्षकांची मोलाची भुमिका आहे, असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.नंदकुमार झावरे यांनी केले.


श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा गावचे सुपूत्र प्रा.शैलेश जाधव यांनी गणित विषयात पी.एचडी पदवी मिळाविल्याबद्दल त्यांचा श्री.नंदकुमार झावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे, एलआयसी विमा प्रतिनिधी संतोष जाधव आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना प्रा.डॉ. जाधव म्हणाले, श्री.नंदकुमारजी झावरे यांनी नेहमीच तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला आहे. अनेक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत केल्याने अनेक विद्यार्थी उच्चस्थ पदावर, व्यवसायात यशस्वी झाले आहेत. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी राहील, असे सांगून आभार मानले.
याप्रसंगी तसेच संस्थेचे सचिव जी.डी.खानदेशे व राहुल झावरे यांनीही प्रा.डॉ.शैलेश जाधव यांच्या यशाचे कौतुक करुन त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!