संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – प्रा.शिवाजी किसन होले यांच्या खुनाचा तपास त्वरित लावावा, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, माजी नगराध्यक्ष अॅड.अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, दिलीप सातपुते, संभाजी कदम, शरद झोडगे, किशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, प्रा.माणिक विधाते, धनंजय जाधव, सुवेंद्र गांधी, संजय गारुडकर, अमित खामकर, निखिल शेलार, नितीन डागवाले, परेश लोखंडे, नितीन कदम, रामदास फुले, सुरेश कदम, तुषार भुजबळ, संदिप दातरंगे, संदेश कार्ले, नितीन शिंदे, राहुल भुजबळ, भरत गारुडकर, विनायक बेल्हेकर, जालिंदर बोरुडे, प्रा.संजय गारुडकर, वैभव लांडगे, आनंदराव शेळके, अनिल इवळे आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नेप्ती येथील प्रा.शिवाजी किसन(देवा)होले यांची दि.23 फेब्रुवारी 2023 रोजी नेप्ती शिवारात रात्री उशीरा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याचा तपास पोलिसांच्यावतीने सुरु आहे, परंतु तपासात अद्याप कोणत्याही कुठल्याही प्रकारची प्रगती दिसत नाही, तरी त्यांच्या मारेकर्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. जर त्यांच्या दशक्रिया विधीपर्यंत मारेकारी सापडले नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शिष्टमंडळाशी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी चर्चा केली. तपास योग्य दिशेने सुरु असून, लवकरात लवकर प्रा.होले यांच्या मारेकर्यांना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी अखिल भारतीय समता परिषदेचे सर्व पदाधिकारी, विविध संघटना, नेप्ती ग्रामस्थ उपस्थित होते.