प्रविण डहाळे खून प्रकरणातील ५ सराईत आरोपींना २४ तासात पकडले ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: नेवासा तालुक्यातील गळनिंब येथील मयत प्रविण डहाळे यांच्या खून प्रकरणातील ५ सराईत आरोपींना २४ तासाच्या आत पकडण्याची कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
अशोक ऊर्फ खंडू किसन सतरकर (वय ४२, रा. गेवराई, ता. नेवासा), ईश्वर नामदेव पठारे (वय ३०, रा. वरखेड, ता. नेवासा), शेखर अशोक सतरकर (वय २३, रा. गेवराई, ता. नेवासा), अरुण ऊर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय गणगे (वय २८, रा. सुरेगांव, ता. नेवासा ), बंडू भिमराव साळवे (वय ३२, रा. बाबुडी बंद, ता. नगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोसई तुपार धाकराव, सपोउपनि भाऊसाहेब काळे, राजेंद्र वाघ, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, विशाल दळवी. फुरकान शेख, पोका बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव व चापोका अरुण मोरे आदिंच्या टिम’ने नेवासा पोलीस ठाण्याचे पोसई संदीप ढाकणे, पोना सुमित करंजकर, पोकाॅ तांबे यांना मदतीस घेऊन पाच आरोपींना पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मित्र प्रविण सुधाकर डहाळे (वय २४, रा. गळनिव, ता. नेवासा) याच्या शेखर सतरकर व अशोक सतरकर यांच्या सोबत मागील भांडणाचे कारणावरुन फोनवर वाद झाले होते. त्या कारणावरुन आरोपींनी तलवार, कोयता, लोखंडो रॉड व लाकडी दांडक्याने प्रविण डहाळे यास मारहाण व जबर जखमी करून जिवे ठार केले, या प्रमोद संभाजी कापसे ( रा. सुरेगांव, ता. नेवासा) यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०२८/२०२३ भादविक ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९ सह आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले होते. यावेळी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीची माहिती घेत असताना पोनि श्री. आहेर यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी खंडु सतरकर व ईश्वर पठारे हे दोघे (वरखेड, ता. नेवासा) येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. एलसीबी टिम’ने नेवासा पोलीस ठाण्याचे पोसई संदीप ढाकणे, पोना सुमित करंजकर, पोकाॅ तांबे यांना मदतीस घेऊन वरखेड (ता. नेवासा) येथे जाऊन आरोपींचा शोध घेता ते मिळून आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलीसांची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अशोक ऊर्फ खंडू किसन सतरकर, व ईश्वर नामदेव पठारे असे असल्याचे सांगितले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांचे इतर साथीदारांबाबत विचारपुस करता त्यांनी आरोपी शेखर सतरकर, अरुण गणगे व बंडु साळवे हे तिसगांव (ता. पाथर्डी) येथे असल्याबाबत माहिती दिल्याने दोन्ही आरोपीना नेवासा पोलीस ठाण्यात हजर केले. एलसीबी टिम’ने तिसगांव (ता. पाथर्डी) येथे जाऊन आरोपींचे ठावठिकाणाबाबत माहिती घेऊन आरोपी शेखर अशोक सतरकर, अरुण ऊर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय गणगे व बंडू भिमराव साळवे यांना ताब्यात घेऊन पुढील तपास कामी नेवासा पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.
आरोपी अरुण ऊर्फ ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली दत्तात्रय गणगे हा स जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे असंख्य गुन्हे दाखल आहेत.