प्रभाग 3 मधील प्रलंबित नागरी समस्या सोडवा ; मनपा आयुक्तांकडे नगरसेवक आसिफ सुलतान



संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – मनपा प्रशासन व सत्ताधारीचा हेतू मुकुंदनगर भागाला कायम दुर्लक्षित केल्याचे आरोप नगरसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.

वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलने करून देखील अद्यापही फेस टू चे काम पूर्ण झालेले नाही मोठी मशीद पासून खालच्या भागात दर्गा दारापर्यंत पाणीपुरवठा 3 ते 5 दिवसा नंतर होत आहे नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागते ज्याप्रमाणे इतर उपनगरांमध्ये प्राधान्य देऊन फेस टू लाईनचे काम पूर्ण करण्यात आले तसेच मुकुंदनगर चे काम पूर्ण करण्यात यावे व प्रभागातील पाण्याची समस्या सोडवण्यात यावी तसेच ड्रेनेज व गटारीची समस्या सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे त्या ठिकाणी जुन्या लाईन चोकप होऊन मैलामिश्रित पाणी वाहत असतो अनेक ठिकाणी चेंबर खचले आहे सफाईसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे अमृत भुयारी गटार योजनेचे काम शहरात सुरू आहे तर दुसऱ्या टप्प्याचे प्रस्ताव सर्व उपनगरासाठी केंद्र शासनाला प्रशासन पाठवीत आहे परंतु त्यामध्ये मुकुंद नगरला या योजनेतून वगळले आहे 35 ते 40 हजार लोकसंख्या आहे गंभीर समस्या असून सुद्धा प्रशासनाने मुकुंदनगरला का या योजनेतून वगळले समजणे पलीकडे आहे. प्र. क्र. 3 व 4 मुकुंदनगर गोविंदपुरा भागाला ही अमृत भुयारी गटार योजनेचे समाविष्ट करावे जेणेकरून ड्रेनेजची समस्या सोडविण्यात येईल व प्रभागांमध्ये मेन रोड व अंतर्गत भागात पथदिवे बंद आहे साहित्य उपलब्ध नाही अंधारामुळे अपघात होत आहे पावसाळ्यामुळे अंधारात चालणे कठीण झाले आहे मोकाट कुत्रे अंधारात हल्ला करतात नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी बंद पथदिवे त्वरित दुरुस्त करावे व प्रभागातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे मागील वर्षी रस्ते पॅचिग करताना मुकुंदनगर भागाला डावलण्यात आले मोठी मज्जित ते दर्गा दायरा भागातील 80 टक्के रस्त्याची कामे करण्याची आवश्यकता आहे पावसाळ्यामुळे रस्ते अजून खराब होणार आहे तरी त्यासाठी उपाययोजना करून मुरूम व खडी टाकण्यात यावी व रस्त्याची पॅचिग करण्यात यावी या मागणीसाठी नगरसेवक आसिफ सुलतान यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील मागणी केली आहे परंतु प्र. क्र.3 मुकुंदनगर भागाला सापत्नी वागणूक दिली जाते असे आरोप करण्यात आले व प्रभागातील सर्व समस्या सोडविण्याकरिता उपाय योजना करण्यात तसेच संबंधितांना आदेश द्यावे अन्यथा नागरिकांसमवेत लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!