संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी युवकांनी अवयव दानाचा संकल्प पत्र स्वयंपुर्तीने भरुन दिली. यावेळी फिनिक्सचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, गौरव काळे, अर्जुन साळवे, बाबासाहेब शिंदे, प्रकाश भालेराव, सिद्धार्थ भालेराव, दिपक आरुण, किरण आरुण, बाबासाहेब कुसळकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य माणसांची ईश्वरसेवा समजून काम केले. मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करण्यासाठी त्यांचे कार्य आपण कृतीतून पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठीच जीवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर दुसर्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयव दान होय. अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असून, याद्वारे आपण मृत्यू नंतरही आपले अवयव दान करुन अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांचे प्राण आपण वाचू शकतो. अशा अनेक रुग्णांसाठी अवयव दान हा एक आशेचा किरण आहे. राष्ट्र पुरुषांना असेच सामाजिक कार्य अपेक्षित होते, त्यांच्या कार्याचा कृतीतून अवलंब केल्यास खर्या अर्थाने समाजोन्नत्तीचे काम होईल. यासाठी प्रत्येकाने अवयव दान चळवळीत सहभागी होणे गरजेचे आहे. या उपक्रमासाठी फिनिक्स फौंडेशन पुढाकार घेत आहे, या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी जालिंदर बोरुडे यांनी केले.
यावेळी बाबासाहेब शिंदे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. यावेळी अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांना अवयव दान पत्रकाचे वाटप करण्यात आले. अनेकांनी यावेळी उत्स्फुर्तपणे आपले अवयव दान संकल्प पत्रे भरुन दिली.