संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
शेवगाव – Ahemnagar Crmie News शेवगाव पोलिस ठाणे अंतर्गत असणा-या बोधेगाव दुरक्षेत्र कार्यालयात तक्रार नोंदवली जात नसल्याच्या कारणास्तव नैराश्य आलेल्या तक्रारदार महिलेने विषारी औषध घेण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि.१८ एप्रिल) सकाळी घटना घडली. या घटनेनंतर शेवगाव पोलिस ठाण्याच्या एकंदरीत कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे या घटनेची एसपी राकेश ओला यांनी दखल घेऊन संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे, असे म्हणणे काही सामाजिक कार्यकर्तेनी म्हटले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील अंतरवाली खुर्द येथील सखुबाई बाबासाहेब कासुळे (वय ६५) या महिलेच्या कुटुंबावर अन्याय करणा-यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. अन्यायग्रस्त महिलेची शेवगाव पोलिस ठाणे अंतर्गत असणा-या बोधेगाव दुरक्षेत्र कार्यालयात तक्रार नोंदवून घेतली जात नाही, म्हणूनच अखेर अन्यायग्रस्त महिलेने नैराश्यातून संबंधित तक्रारदार महिलेने बोधेगाव दुरक्षेत्र कार्यालयासमोर विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळेवर त्या महिलेच्या हातातून विषारी औषधाची बाटली तेथील उपस्थितीत पोलिस कर्मचाऱ्याने हिसकावून घेण्याची घटना मंगळवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनेची शेवगाव – पाथर्डी परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.