गावागावांतील, तालुक्यातील ‘व्हाईट कॉलर आका’चा बंदोबस्त कराच….
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः पोलिसांची भीती जेव्हा कमी होते, तेव्हाच गुन्हेगारी वाढत असते. तीच परिस्थितीही पाथर्डी तालुक्यात झाली आहे. अनेक वाटत आहे की, ‘पोलिस आपले काहीच करु शकत नाहीत’ ही भावना झाली आहे. या परिस्थितीमुळे पाथर्डीत गुन्हेगारी दिवसेेंदिवस वाढत चाललेली आहे. या गुन्हेगारीला थांबविण्यासाठी ‘व्हाईट कॉलर’ गावागावातील व तालुक्यात तयार झालेले ‘आका’चा पोलिसांनी बंदोबस्त केला पाहिजे. यासाठी अहिल्यानगर पोलिस अधीक्षकांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात ‘सिंघम्’ सारख्या पोलिस अधिकार्यांची नेमणूक करावी, अशी शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. पाथर्डीत अनेक गंभीर गुन्हे घडूनही पोलिसांकडून जुजूबी कारवाई होते, यामुळे नागरिकांना थेट न्याय मागण्यासाठी न्यायालयात जावे लागत आहेत. हे का? ही बाबच गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक साहेबांनी बारकाईने पाथर्डीतील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन कायदा सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी त्या गुन्हेगारीवर ‘सिघंम्’ स्टाईलने कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी एका पंचवीशीतल्या तरुणांना तडीपार गँगने घरातून उचलून नेवून वनदेवाच्या डोंगरात लोखंडी रॉड, दगड व लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत सराफाच्या तरुणाचा हात फॅक्चर झाला असून, शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रीया केली आहे. आरोपींनी पुन्हा थेट खासगी रुग्णालयामध्ये जाऊन मारहाण केलेल्या युवकावर पोलीसात गुन्हा दाखल केला तर तुला जिवे मारु अशी धमकी दिली आहे. त्यामुळे आज तिसर्या दिवशीही पाथर्डी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीसांनी अत्याचारग्रस्त युवकाला आधार देऊन सुमोटो फिर्याद दाखल करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
….पाथर्डी सराफाच्या तरुणाला तडीपार गॅँगकडून लोखंडी रॉडने उचलून नेवून बेदम मारहाण
वनदेवाच्या डोंगरात अमानुष छळ; रॉड व दगडाचा वापर; मारहाण करतांना आरोपींना काढले शुटींग मस्साजोग, शिरुरच्या खोक्याच्या घटनेनंतर पाथर्डीत तडीपार गँगचा उच्छाद; गुन्हा दाखल केल्यास जिवे मारण्याची धमकी; तडीपार आरोपीचा गुन्ह्यात सहभाग……
मस्साजोग, शिररुच्या घटनेनंतर पाथर्डीत देखील अशा क्रुर व निर्दयी घटना नियमीतपणे घडू लागल्याने संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षापासून पाथर्डीत मस्साजोग व शिरुरच्या घटनासारख्या घटना नियमीतपणे घडत होत्या. मस्साजोग व शिरुरच्या घटनेवर माध्यमे व लोकप्रतिनिधींनी यावर प्रकाश टाकल्याने राज्याचे लक्ष अशा घटनाकडे वेधले गेले. अवैध सावकारकी, जमिनीचा बेकायदेशीर ताबा, मारहाण, राजकीय दबावातून दमदाटी, मारहाण, हनीट्रॅप, अॅट्रॉसीटी, छेडछाड, विनयभंग, असे खोटे गुन्हे दाखल करण्याची भिती दाखवून पाथर्डीत गेल्या काही वर्षापासून असे सर्रास प्रकार घडत आहेत. अनेक प्रकरणात पाथर्डी शहर व तालुक्यातील गुन्हेगारांनी अनेकांना अमानुष मारहाण केलेल्या आहेत. मात्र फिर्याद दाखल केली तर हे सराईत गुन्हेगार आपल्याला पुन्हा मारहाण करतील. पोलीस संरक्षणावर नागरीकांचा व बळी पडलेल्या अत्याचार ग्रस्ताला विश्वास वाटत नाही. त्यातूनच अशी गुन्हे वारंवार घडत आहेत.
सराफाच्या तरुणाला मारहाणीच्या या घटनेत समजलेली माहिती अशी की, धुलीवंदनाच्या दिवशी तडीपार गँगच्या गुन्हेगारी वृत्तीच्या गुंडानी गाडीची वापरण्यासाठी मागणी केली. या युवकाने गाडी देण्यास नकार दिल्याने किरकोळ बाचाबाची झाली. त्यानंतर पुन्हा या सराफाच्या युवकाला शहरातील राहात्या घरातून उचलून नेवून धामणगांव रोडला असलेल्या वनविभागाच्या जंगलात नेवून लोखंडी रॉड, लाथाबुक्याने 6 ते 8 लोकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तेथून पुन्हा गायछापजवळ नेवून पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत सराफाच्या युवकाचा हातपूर्ण पणे फॅक्चर झाला असून, पाठीवर, पोटावर, छातीवर रॉडचे वळ आहेत. जखमा आहेत. या मारहाणीत हात फॅक्चर झाला असून हाताची शस्त्रक्रीया करण्यात आली आहे.
अत्याचारग्रस्त जखमी युवकाने गुन्हा दाखल करु नये, यासाठी रात्रीच्या सुमारास पुन्हा सराईत गुन्हेगार जमावाने खाजगी रुग्णालयामध्ये दाखल झाले. गटा-गटाने बाहेर थांबले. जखमी युवकाचे नातेवाईकांना बाहेर काढून दिले. व त्या युवकाला पुन्हा जखमी अवस्थेत मारहाण करण्यासाठी धावू लागले. डॉक्टराच्या कॅबीनमध्ये जावून धुडगूस घातला. डॉक्टरांच्या मध्यस्थीने या जमावाला बाहेर काढले. मारहाण दमदाटी यामुळे अत्याचारग्रस्त युवक व त्याचे नातेवाईक पूर्णपणे घाबरले असून त्यांनी आरोपीच्या दहशतीने फिर्याद दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत उपचार अत्याचार ग्रस्त तरुणावर उपचार केलेल्या खाजगी डॉक्टरांनी पोलीसाकडे एम.एल.सी दाखल केलेनंतर पाथर्डी ठाण्याचे पोनि संतोष मुटकुळे यांनी पोउपनि महादेव गुट्टे यांना रुग्णालयात जावून जखमी तरुणांची माहिती घेतली. विचारपूस केली. मात्र जखमी तरुणांच्या कुंटुबीय भेदरलेली असल्याने व आरोपी हे सराईत असून शहरात त्यांची दहशत व दादागीरी आहे. हे पुन्हा आम्हाला जिवे मारतील अशी भिती असल्याने गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. पोलीसांनी या घटनेत सुमोटो फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.