(DIPLOMA IN CYBER LAW)
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- जिल्हा पोलीस दलातील सायबर पोलीस स्टेशनमधील पोलीस नाईक अभिजित अरकल, पोलीस अंमलदार राहुल गुंडू ह्यांनी न्यू लॉ कॉलेज अहमदनगर व एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने डिप्लोमा इन सायबर लॉ (DIPLOMA IN CYBER LAW) या पदवीकेमध्ये विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होऊन DIPLOMA IN CYBER LAW ही पदवी प्राप्त केली आहे.
न्यू लॉ कॉलेज मार्फत घेण्यात येणारी ही पहिलीच batch होती. या पदवीकेचे CANVOCATION CEREMONY हे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अद्यक्ष माजी आमदार श्री नंदकुमार झावरे साहेब, उपाध्यक्ष आर.एन दरे, सचिव जे.डी खानदेशे, सहसचिव व्ही.डी. आठरे पाटील, विश्वस्त श्रीमती डी.एस. म्हसे पाटील म्याडम, खजिनदार व्ही.पी. भापकर साहेब, न्यू लॉ कॉलेज अहमदनगरचे प्राचार्य श्री तांबे सर, पांढरे सर, श्रीमती प्रियंका खुळे म्याडम, अतुल म्हस्के सर, दीपक वराट सर, सुनील जाधव सर, शेळके सर, मोरे सर, तोडमल सर, पाचे सर, राकेश बोगा, केदार सर उपस्थित होते.