संग्राम त्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- भिंगार नजिकाच्या नागरदेवळे या ठिकाणी पै.योगेश धाडगे मिञमंडळीकडून मोफत श्रमक कार्ड नोंदणी शिबीर मंगळवारी (दि.१४) घेण्यास प्रारंभ झाला आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, आत्तापर्यंत २०० च्या आसपास नागरिकांनी श्रमक कार्ड नोंदणी केली आहे. या उपक्रमांमुळे अनेक गोरगरिबांना श्रमक कार्ड योजनेत सहभागी होत आल्याने पै.योगेश धाडगे यांचे नागरदेवळे पंचक्रोशीतील नागरिकांनी आभार मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पै.योगेश धाडगे मिञमंडळीचे कैलास गायकवाड, असिफ शेख, भोला लोंखडे, जावेद शेख, भाऊ गाडेकर, भागवत जाधव, पप्पू धाडगे, सागर गवळी, भुषण भूजबळ आणि रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल शिंदे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.