पैसा मिळणारच आहे, पण दूध चांगल्या प्रतिचे देण्यासाठी सदैव जागृत राहिले पाहिजे : चेअरमन राजेश परजणे पा.
सावळीविहीर येथे गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघाच्या संकलन केंद्राचा शुभारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला अधिक महत्त्व आहे. हे वास्तव असून, शेतकऱ्यांनीही दूध व्यवसाय करताना पैसा मिळणारच आहे, पण त्याबरोबरच दूध चांगल्या प्रतिचे देण्यासाठी सदैव जागृत राहिले पाहिजेत, असे प्रतिपादन गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे पा. यांनी केले.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दूध संघाचे वतीने श्री साई विठ्ठला दूध संकलन केंद्र प्रोप्रा श्री लांडबले आणि शेतकरी मित्रपरिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दूध संकलन केंद्राचा शुभारंभ चेअरमन राजेश परजणे पा. यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे पा., लोकनियुक्त सरपंच उमेश जपे पा., उपसरपंच विकास जपे पा, मा उपसरपंच सुनील जपे पा., मा उपसरपंच गणेश कापसे पा., मच्छिंद्र थोरात, रामदास जपे पा., नितीन जपे पा., जालिंदर आगलावे पा., गोकुळ आगलावे पा., आदिंसह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित आहेत.