सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचोली गहिनीनाथ गडाची श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे सालाबादप्रमाणे पैठण षष्टी यात्रेसाठी प्रस्थान झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी दिंडी सोहळ्यासोबत अनेक वारकरी भाविक पायी चालत निघाले आहेत. पालखी दिंडी सोहळा गहिनीनाथ गड येथून पुढेजवळ असलेल्या हातोला (ता.आष्टी) येथे मुक्कामी थांबणार आहे. उद्या (गुरुवारी)सकाळी चिंचपूर पांगुळ येथे जेवणासाठी थांबणार आहे. तेथून पुढे पालखी पैठणसाठी रवाना होईल.
पुढील तीन चार दिवस पायी चालत ही पैठण येथे नाथांच्या नगरीत षष्ठीसाठी दाखल होणार आहे. अशी माहिती गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी दिली.