पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात शहर काॅग्रेसचे आंदोलन


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात नगर शहरामध्ये आगळेवेगळे आंदोलन काँग्रेसने केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बाजारपेठेत चक्क घोड्यावरून फेरफटका मारत आंदोलन करून नागरिकांचे भाव वाढीवर लक्ष वेधले. बाजारपेठेमध्ये काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती. यावेळी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आंदोलकांचे मोबाईल मध्ये फोटो टिपले. बघ्यांची गर्दी झाली होती.
काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पेट्रोल, डिझेल , गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये विधिमंडळ पक्षनेते, महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या आदेशावरून आंदोलने होत आहेत. नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आज सर्जेपुरातील सबलोक पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काँग्रेसने तीव्र निदर्शने करीत आंदोलन केले.
यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धोंडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, उपाध्यक्ष खालील सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, नगर तालुका विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजित जगताप, इंटक जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, ज्येष्ठ नेत्या जरीना पठाण, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, शहर जिल्हा सचिव मुबिन शेख, खजिनदार मोहनराव वाखुरे, आदी उपस्थित होते.
पेट्रोल पंपावर निदर्शने झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीने नगर शहरातील बाजारपेठेमध्ये घोड्यावरुन भाजप सरकारच्या विरोधामध्ये सर्जेपुरा ते एमजी रोड वरील घास गल्ली चौकापर्यंत प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात आली. या घोड्यावरती शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वतः किरण काळे हे विराजमान झाले होते. ते मोदी सरकारच्या विरोधामध्ये दरवाढीच्या विरोधात घोषणा देत होते. तर कार्यकर्ते त्यांच्या मागे घोषणा देत होते. यामुळे बाजारपेठ दणाणून गेली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी दुचाकी गाड्या लोटत सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.
आंदोलनात्मक मिरवणुकीचा समारोप प्रसंगी बोलताना किरण काळे म्हणाले की, पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. डिझेलचा भाव ९२ रुपयाला येऊन ठेपला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर ९०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मोदी सरकारने कोरोना संकट काळामध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल, पेट्रोल, गॅस यांच्यावरती कर लादत लाखो कोटी रुपयांचा नफा मिळवला असून सामान्य माणसाला मात्र महागाईच्या खाईत मध्ये ढकलले आहे.
पूर्वी घरामध्ये दोन माणसं कमावती असली तरी देखील घराचे खर्च भागत होते. महिलांचे किचनचे बजेट कोलमडत नव्हते मात्र कोरोना संकट आल्यापासून आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेली सर्वसामान्य जनता ही या दरवाढीमुळे आता घरातील सर्व माणसे काम करून देखील घर खर्च भागवू शकत नाहीत. ही विदारक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्य माणसांमध्ये केंद्र सरकार बद्दल तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असल्याचे यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले. यावेळी मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंत गारदे, अनिस चुडीवाला आदींची भाषणे झाली.

👉पेट्रोल पंपावर गांधीगिरी
यावेळी पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केली. पेट्रोल भरणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देत पेट्रोलचे दर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारले. त्यावेळी नागरिकांनी शंभर रुपये दर असल्याचे सांगितल्यानंतर आपण या दरवाढीबद्दल खुश आहात का असे काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांना विचारत होते. यावेळी नागरिकांनी पेट्रोलच्या वाढलेल्या दराबद्दल तीव्र नाराजी केंद्र सरकार बद्दल व्यक्त केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये गांधीगिरी करत दरवाढीच्या विरोधात जनजागृती केली.
यावेळी लखन छजलानी, शहर जिल्हा सहसचिव शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे, क्रीडा विभागाचे मच्छिंद्र साळुंखे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रशांत जाधव, शरीफ सय्यद, अक्षय पाचारणे, अजय घोलप, आदित्य यादव,अजय खराडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!