संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीचे सहशिक्षिका श्रीमती राऊत पूनम पांडुरंग यांच्या ‘पुनवेचं शब्द चांदणं’ या काव्यसंग्रहाचे ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य नगरी, पुणे येथील राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात प्रकाशन झाले.
श्रीमती पूनम राऊत यांना महाविद्यालयीन जीवनापासून चारोळ्या, कविता लिहिण्याची आवड होती. हाच छंद त्यांनी कायम जोपासला. सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, विनोदी, निसर्गकविता, व्यसन, बळीराजाच्या व्यथा अशा विविध विषयांवर रचना त्यांनी लिहिल्या.त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या आग्रहास्तव कवितासंग्रह प्रकाशित करण्याचे ठरवले.खुप दिवसांपासुनच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी ‘पुनवेचं शब्द चांदणं’ हा काव्यसंग्रह तयार केला. काव्यसंग्रहासाठी एटिएमचे राज्य संयोजक विक्रम दादा अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली एटिएम पब्लिकेशन मिळाले.या काव्यसंग्रहासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बहुआयामी व्यक्तिमत्व,गायक,चित्रकार शिवाजी खैरे सर (संस्थापक,अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई) यांची प्रस्तावना,पहिले विश्व साहित्य संमेलन अध्यक्ष श्री मधुसूदन घाणेकर यांचा पाठराखण संदेश,डॉ.श्री शंकर आसाराम गाडेकर साहेब (ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,शेवगाव) व श्री.निलेश दौंड सर(कवी, शिक्षक,अध्यक्ष,क्रियेटीव्ह फाऊंडेशन,शेवगाव) सुप्रसिद्ध कवयित्री अस्मिता मराठे यांचे शुभेच्छा संदेश लाभले. तसेच काव्यसंग्रह निर्मितीसाठी लक्ष्मण झिंजुर्के नाना यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दि. 5 मार्च 2023 रोजी एटिएम चे 3 रे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यामध्ये व्यासपीठावर विराजमान डॉ. वसंत काळपांडे (माजी शिक्षण संचालक), डॉ. गोविंद नांदेडे (माजी शिक्षण संचालक),मा. दिनकर टेमकर (माजी शिक्षण संचालक), मा. कृष्णकुमार पाटील, मा.नेहा बेलसरे, डॉ. प्राची साठे, डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. शोभा खंदारे, मा.किरण केंद्रे, डॉ. विशाल तायडे, मा.प्रविणकुमार काळमपाटील,विक्रम अडसूळ, नारायण मंगलाराम आदी मान्यवरांच्या हस्ते पुनवेचं शब्द चांदणं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्यासाठी सर्व एटिएम परिवार, पती श्री.विष्णू वाघमारे, श्री.भगवान फुंदे उपस्थित होते.काव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल सर्व कुटुंबीय, नातलग, शिक्षक बंधूंभगिणी, मित्रपरिवार,अधिकारी वर्ग,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांकडून पुनम राऊत यांचे अभिनंदन होत आहे.