संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
भारतीय इतिहासात अनेक थोर, कर्तबगार स्त्रिया होऊन गेल्या आहेत.अगदी वेदकालीन गार्गी. मैत्रेयीपासून ते जिजाबाई.राणी लक्ष्मीबाई. अहिल्याबाई होळकर. सावित्रीबाई फुले असा हा थोर वारसा.त्यातिल अहिल्याबाई होळकर या त्यांच्या पवित्र आचारणामुळे आणि धार्मिक वृत्तीमुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई अशा नावाने च ओळखल्या जातात असे मत युवक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब सापांनकर यांनी वेक्त केले.
पुण्यश्लोक म्हणावल्या दोन – चार व्यक्तीची नावे सांगितली तर अहिल्याबाई ची माहिती लक्षात येईल. पुण्यश्लोक नलोराजा. पुण्यश्लोक युधिष्ठिर. पुण्यश्लोक विदेहशच . पुण्यश्लोक जनार्दन. महाभारतातील नल ( दमयंती चे पती ) युधिष्ठिर ( धर्मराज ). विदेही जनक ( सीतेचे पिताश्री ) आणि जनार्दन ( भगवान श्रीकृष्ण ). अशी ही थोर परांपरां आहे, अहिल्याबाई ना मल्हारराव होळकरांनी सुन म्हणून पसंत केले.त्या काळी विवाह बालकयात होत असत. हे लक्षात घेता,त्या देवाच्या घरुनच गुण संपदा, दैवी सत्व गुणांची शेंदुरी घेऊन आल्या होत्या हे लक्षात येईल,मात्र या अहिल्या देवीनी आयुष्यात खूप खूप दुःख भोगले, सासरे मल्हारराव व सासूचे मुत्यू तर पाहिलेच,त्यांत नवल नाही. परंतु स्वत:चे पती.मुलगा मालेराव.सती जाणारी सुन .जावाईआणि त्यांच्या मुत्यूमुळे सती जाणारी मुलगी मुक्ताबाई एवढेच नव्हे तर एकुलता एक नातू ही काळाचे भक्ष होताना त्यांना बघावे लागले बुंदेलखंड.माळवा इंदोर हा सारा संपुर्ण प्रदेश. उत्पन्न भरपूर पण अहिल्याबाई नी ती सारी संपत्ती. प्राजेच्या कल्याणासाठी नदीवर घाट. धर्मशाळा. आणि पाणपोया यांच्या साठी खर्च केली.म्हणूनच त्यां पुण्यश्लोक पदवी पर्यंत पोहचल्या.त्यांना वंदन करुया आपले ते कर्तव आहे हा इतिहास समाजापर्यंत पोहोचला पाहिजे व त्यांनी केलेल्या कृतर्व. म्हणून त्यांची जयंती समाजबांधवांनी घरोघरी साजरी करावी असे आवाहन राज्य महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष संघटनेचे बीड जिल्हाचे प्रा.बाबासाहेब सापानकर यांनी केले आहे.
संकलन : राजेंद्र दुनबळे