संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बीड – बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवदास बिडगर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष-धनगर समाज महाराष्ट्र राज्य, तसेच युवा नेते बळीराम तात्या खटके ,सुधाकर पांढरे, संदीप काजगुंडे उपसभापती, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास, राजे यशवंतराव होळकर यांचा इतिहास, राजे मल्हारराव होळकर यांचा इतिहास, जागा करण्यासाठी गावगाड्यातील वाडी वस्तीवरील युवकांनी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे . पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे कार्य देशभर असून या कार्याचा जनजागृती आपण सर्वांनी केली पाहिजे अहिल्यादेवी होळकरांनी सर्व समाज बांधवांसाठी काम केले अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य देशभर आहे हे आपण युवा पिढीने सांगितले पाहिजे.
आय टु आय येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर याचा लाभ गोरगरीब कष्टकरी यांनी घेतला पाहिजे आज बीडमध्ये माननीय प्रकाश भैय्या सोनसळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचे आयोजन केले बद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम शिबिराच्या माध्यमातून जयंती च्या माध्यमातून या बीड जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे यातून जनजागृती करण्याचे काम होते असे पडळकर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रकाश भैय्या सोनसळे म्हटले की पडळकर साहेब मी या बीड जिल्ह्यातील समाज बांधवांना एकत्र करण्याचे काम मी अनेक दिवसापासून करत आहे पडळकर साहेब मी समाज एकत्र करण्यासाठी साप्ताहिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिवर्तन सभा सुरू केली या साप्ताहिकांमधून होळकर शाहीचा इतिहास जागा करण्याचं काम केलं मेंढपाळ बांधवांवर अन्याय अत्याचार रोखण्याचं काम साहेब मी करण्याचा प्रयत्न केला. ज्याठिकाणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती होत नाही साहेब त्या ठिकाणी मी जयंती साजरी करण्याचं काम केलं या जयंतीच्या माध्यमातून या अभिवादन सभेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास जागा करण्याचं काम मी करतोय या बीड जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती या जयंतीनिमित्त साहेब आम्ही अधिकारी बांधवांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भव्य मिरवणूक काढून जयंती साजरी केली जयंतीला समाजबांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला. माझी एक मागणी आहे पडळकर साहेब आपले प्रेम आपला आशीर्वाद माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा पाहिजे एवढीच तुमच्याकडे माझी छोटीशी मागणी आहे असे बोलताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले.
यावेळी अर्जुन महारनवर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर गाणं गायले त्याबद्दल सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी अर्जुन महानवर यांचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,तसेच पोलीस उपनिरीक्षक पदी ज्ञानेश्वर देवकते यांची निवड झाल्याबद्दल सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वाडी वस्तीवरील प्रत्येक गावागावातून या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव युवा उद्योजक, युवक, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माता-भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी अहील्या जन्मोत्सव समिती बीड जिल्हा सर्व सदस्य शीतल मतकर भारत गाडे, ज्ञानेश्वर ढोरमारे, अंकुश गवळी, सुधाकर वैद्य, अमर वाघमोडे, विकास सोनसळे, बापू प्रभाळे, बाळासाहेब गावडे, रवींद्र गाडेकर ,अशोक गावडे , सुग्रीव देवडे,अशोक पांढरे, बाळू गाडे, हनुमंत राहिंज ,राजाभाऊ भोंडवे ,डॉ. महारनवर ताई, डॉ.संतोष महानवर, अक्षय नरोटे,विजय घोंगडे, व पत्रकार बांधव पोलीस बांधव आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण नजन सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाळासाहेब गावडे सर यांनी केले.