पाथर्डी, शेवगाव परिसरात घरफोडी करणा-या सराईत चोरटे जेरबंद ; ‘अहिल्यानगर एलसीबी’ ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी: पाथर्डी व शेवगाव परिसरात घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांना अहिल्यानगर एलसीबी टिम’ने जेरबंद केले आहे. या आरोपींकडून ३ लाख ६ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सचिन ईश्वर भोसले (वय २१, रा.बेलगाव, ता.कर्जत), सचिन बंबळया काळे (वय २१, रा.नागझरी, ता.गेवराई, जि.बीड) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, जालींदर माने, प्रशांत राठोड, अरूण मोरे आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील १ लाख ३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला, या बाळासाहेब यशवंत भगत, (रा.कासार पिंपळगाव, ता.पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं.९२४/२०२४ बीएनएस कलम ३३१(२),३३१(३),३०५(अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या घडलेल्या घटनेबाबत एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक नेमूण कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
आदेशा प्रमाणे पोनि श्री.आहेर यांनी एलसीबीची टीम नेमूण गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
एलसीबी तपास टीमने घटनाठिकाणी भेट देऊन,पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीतील चोरीस गेला माल व आरोपीची माहिती घेत असताना दि.१६ ऑक्टोबर २०२४ रोजी पोसई सालगुडे यांना माहिती मिळाली की, गुन्हा हा आरोपी सचिन ईश्वर भोसले (रा.बेलगाव, ता.कर्जत) याने त्याच्या साथीदारासह केला आहे. ते पाथर्डीवरून अहिल्यानगर येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबी टिम’ने बेलेश्वर चौक, अहिल्यानगर येथे थांबून दोन संशयीत दुचाकीवर आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांची नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे सांगितले. एलसीबी तपास टीमने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता आरोपी सचिन ईश्वर भोसले याच्याकडून २ लाख १० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने, सचिन बंबळया काळे याच्याकडून ५६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व एक दुचाकी असा एकूण ३ लाख ६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी गुन्हा हा त्यांचे साथीदार फरार असणार गहिन्या ईश्वर भोसले (रा.बेलगाव, ता.कर्जत) व भगवान ईश्वर भोसले (रा.बेलगाव, ता.कर्जत) यांचेसह गुन्हा केल्याचे सांगीतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे चौकशी करता त्यांनी त्यांच्या फरार साथीदारासह कासारपिंपळगाव, (ता.पाथर्डी) व सामनगाव (ता.शेवगाव) येथे घरफोडीचे गुन्हे केल्याबाबत दिलेल्या माहितीवरून २ गुन्हे उघडकिस आलेले आहेत. याप्रमाणे -अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम १) पाथर्डी ९२४/२०२४ बीएनएस ३३१(२),३३१(३),३०५(अ)
२) शेवगाव ७५७/२०२४ बीएनएस ३३१(३), ३०५(अ).
ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले. पुढील तपास पाथर्डी पोलीस हे करीत आहे.