सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी येथे जागतिक होमिओपॅथिक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्यातील डॉ.प्रकाश खेडकर व डॉ अनिल नवथर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पाथर्डीतील यावेळी डॉक्टरांना संबोधित केले.
डॉ प्रकाश खेडकर यांनी सांगितले की,रुग्णांसाठी होमिओपॅथिक वैद्यकीय शास्त्र हे जगातील दोन नंबरचे आवडते असे शास्त्र आहे. या औषधांचा उपयोग करून पेशंट विना साइड-इफेक्ट बरे होऊ शकतात. त्याचबरोबर डॉ.अनिल नवथर यांनी जास्तीत जास्त होमिओपॅथिक डॉक्टरांनी होमिओपॅथीची प्रॅक्टिस सुरू करावी, असे आवाहन केले. शिवाय त्यासाठी जी काही मदत लागेल ती आपण करणार असल्याचे यावेळी सांगितले.
१० एप्रिल हा दिवस होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी व रुग्णासाठी एक सुवर्ण दिवस असतो. कारण याच दिवशी होमिओपॅथीचे जनक डॉ.सॅम्युअल हनेमान यांचा जन्म १७५५ साली झाला होता.त्यामुळे हाच दिवस जगभरात होमिओपॅथी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
याप्रसंगी पाथर्डी येथील माजी पंचायत सदस्य डॉ.राजेंद्र खेडकर, डॉ.शिरीष जोशी, डॉ. नितीन राठोड, डॉ.राहुल वेलदे, डॉ. बाळकृष्ण जवरे, डॉ.अश्विनी लांडे, डॉ.प्रज्ञा शिरसाट,डॉ.मनीषा भोसले डॉ.जोशी मॅडम, डॉ.सौ.सुमन खेडकर, शेवगाव येथील डॉ.नरेंद्र पायघन आदी उपस्थित होते.