पाथर्डी, नेवासा येथील महिलांना चाकुचा धाक दाखवून लुटणारा जेरबंद ः एलसीबी टीमची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः पाथर्डी, नेवासा येथील महिलांना चाकुचा धाक दाखवून लुटणार्यास पकडून त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार 500 रू किंमतीचे मुद्देमालासह 5 गुन्हे उघडकीस आणण्यात अहिल्यानगर क्राईम बॅ्रंच टीमला यश आले आहे.
एसपी राकेश ओला यांचच्या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम बॅ्रंचचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार सुरेश माळी, गणेश धोत्रे, शाहीद शेख, रविंद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, भगवान थोरात, किशोर शिरसाठ, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, महादेव भांड व चंद्रकांत कुसळकर आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.17 फेब्रुवारी 2025 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आजी घरामध्ये बसलेल्या असताना अज्ञातांनी घरात येऊन, धारदार शस्त्राचा धाक दाखवून आजीच्या नाकातील सोन्याची नथ ओरबडून चोरून नेली, या संतोष भगवान खेडकर (वय 42, रा.मालेवाडी, ता.पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाणे गुरनं. 139/2025 बीएनएस कलम 309 (4), 3 (5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.23 फेब्रुवारी 2025 रोजी अहिल्यानगर क्राईम ब्रॅँच टीम पाथर्डी पोलीस ठाण्यात गुरनं 139/2025 या गुन्हयाचा तपास करीत असताना तपासी टीमला माहिती मिळाली की, गुन्हा सचिन ईश्वर भोसले (रा.बेलगाव, ता.कर्जत) याने त्याच्या भावासह केला आहे. ते त्यांच्या राहत्या घरी बेलगाव (ता.कर्जत) येथे येणार आहे. तपासी टीमने मिळालेल्या माहितीवरून बेलगाव (ता.कर्जत) येथे आरोपींचा त्यांच्या राहत्या घरी शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपींना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सचिन ईश्वर भोसले (वय 25, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर), अल्पवयीन (वय 17, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याने पंचासमक्ष एकूण 3 लाख 50 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागिणे वेगवेगळे दागिने व एक चाकू असा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
तपासी टीमने सचिन ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी पाथर्डी तालुक्यात सांगवी, करोडी व मालेवाडी (ता.पाथर्डी) येथे अल्पवयीनसोबत गुन्हा केल्याची माहिती दिली. सचिन ईश्वर भोसले याच्याकडे आणखी कोठे गुन्हे आहेत, याबाबत विचारपूस केली असता त्याने फरारी पैर्या उर्फ पैरेदार उमरका भोसले, गाडया उर्फ गाडेकर झारक्या चव्हाण (दोघे रा.नवी नागझरी, ता.गेवराई, जि.बीड) यांनी मिळून सौंदाळा, हांडीनिमगाव (ता.नेवासा) येथे टीव्हीएस रायडर दुचाकीवर जाऊन चोरी केली असल्याची माहिती दिली. ताब्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याने त्याचे साथीदारासह नेवासा व पाथर्डी येथे केलेल्या गुन्हयांच्या सांगीतलेल्या माहितीवरून पाथर्डी व नेवासा पोलीस ठाण्यातील 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुरनं 139/2025 बीएनएस 309 (4), 3 (5) या गुन्हयाचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस हे करीत आहे.