संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी–पत्रकार दिनाचे औचित्य साधूनखासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील सर्व माध्यमातील पत्रकाराना शाल पुष्प-गुच्छ देऊन गौरव करत सन्मान केला.
यावेळी बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की,हिंदू धर्मातील अशिक्षित-गरीब समाजातील लोकांना त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगवेगळे अमिषे दाखवून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे.धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विशिष्ट लोकांकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी तेढ निर्माण केली जात आहे.
यावर तसेच मुला-मुलीकडून आपल्या आई वडिलांना अंधारात ठेऊन लग्न केले जात आहे. या सारख्या सामाजिक प्रश्नांवर पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवावा असे आवाहन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.सुजय विखे-पाटील यांनी केले. यावेळी आ मोनिका राजळे,मा.नगराध्यक्ष अभय आव्हाड गोकुळ दौंड आदींनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
विखे पुढे म्हणाले की आई वडील यांना विस्वासात ना घेता विवाह करता येणार नाही. तसेच लव्ह जिहाद याविरुद्ध केंद्रात कडक कायदा होणे गरजेचे आहे.यासाठी आपण मागणी करणार आहोत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शेवगाव-पाथर्डी च्या आमदार मोनिकाताई राजळे या होत्या.
याप्रसंगी सर्व पत्रकारांशी संवाद साधत खा.विखे यांनी उपस्थित पत्रकारांची मने जिंकली. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.यावेळी संजय बडे, अभयराव आव्हाड, काशिनाथ पा.लवांडे, माणिक खेडकर, गोकुळ दौंड, अर्जुन शिरसाठ, प्रतीक खेडकर यांच्या सह पाथर्डी तालुक्यातील सर्व माध्यमाचे पत्रकार बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
✍🏻संकलन-सोमराज बडे
मोबा.९३७२२९५७५७