पाथर्डी तालुक्यातील दुर्दैवी घटनेतील मयत आई ‘च्या चुमूकल्याचा नुकताच दुखमय वातावरणात वाढदिवस…
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork l Pahtrdi news
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी या छोट्याशा गावात घडलेली संतापजनक घटना.. या ठिकाणी काबाडकष्ट करून आपला उदरनिर्वाह करणारे रामकिसन कारभारी बडे हा गृहस्थ आपल्या पत्नीसह राहत होते. बडे यांना एकूण चार मुली आहेत. यापैकी यातील सौ.सारिका ही मोठ्या आनंदाने आपला मोठा मुलगा ओमकार व नुकताच जन्म घेतलेल्या लहानग्या बाळासह आई-वडिलाच्या घरी आली होती. पण तिचे दुर्दैव… उन्हाळयाचे दिवस असल्याने आपल्या कुटुंबातील आई लताबाई व वडील रामकिसन बडे, बहिण कविता आणि सौ.सारिका ही आपल्या लहानग्या बाळासह घरासमोरील पडवीत झोपलेले असतानाच, हिचा केवळ अल्पशेतजमिनीच्या वादातून सखा चुलतभाऊ नामदेव अंबादास बडे व त्याचा भाचा अतुल पोपट फुंदे या दोघांनी मिळून रविवारी दि.२८ मे २०२३ च्या मध्यरात्री डोक्यात निर्दयीपणे घाव घालून सौ.सारिका हिला ठार मारले, तर आई लताबाई यांनाही डोक्यात व बहिण कविता हिला पायावर गंभीर मारले, यात त्या सुदैवाने वाचल्या. या घटनेत सौ.सारिका ही ठार झाल्याने तिचा १३ वर्षाचा मुलगा ओमकार व नुकताच घटनेच्या वेळी ६ महिन्याचे ते चुमूकल ही दोघे भांवडे अनाथ झाली. यात सौ.सारिका हिच्या त्या चुमकल्याचा नुकताच पहिला वाढदिवस झाला. परंतु या लहानग्या चुमूकल्याबाळाच्या वाढदिवशी आई सौ.सारिका नसल्याने आई लताबाई, वडील रामकिसन बडे, बहिण सौ. सुरेखा बाबासाहेब ढाकणे, सौ.राणी संतोष पालवे, सौ.कविता शरद घुगे आणि उर्वरित उपस्थित पाहुण्यांच्या डोळ्यात अश्रू होती.
समाजात राहात असताना मयत सौ. सारिका हिला अनेक वाईट प्रवृत्तींना तोंड देत तिने केवळ आपले कुटुंब गरीब असल्याकारणाने आपले कष्टमय जीवन व्यथीत केले. वडील रामकिसन बडे हे तसे स्वभावाने भोळा, पण व्यसनाधीन होता. याचा फायदा घेऊन काही अपवादात्मक लोकांनी मयत सौ. सारिका हिच प्रथम वय कमी असतानाच पिंपळनेर (ता.पाटोदा,जि.बीड) या ठिकाणी एका विधुर असणा-या गृहस्थाशी विवाह लावून दिला. यानंतर काही कालावधीत त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सारिका ही विधवा झाली, त्यावेळेस तिला ओमकार नावाचा दोन वर्षाचा मुलगा होता. या घटनेनंतर मध्यंतरीच्या काळात ती येळी (ता.पाथर्डी,जि.अ.नगर) या ठिकाणी आईवडीलाकडे राहत होती. यानंतर काही वर्षांनी सारिका हिचा गणेशवाडी (ता.नेवासा) या ठिकाणी बापूराव हंगे यांच्याबरोबर पुन्हा करोना काळात दुसरा विवाह लावून दिला. यानंतर सौ सारिका हिला बापूराव हांगे यांच्यापासून एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे बापूराव व सारिका हांगे कुटुंबही आनंदी होते. या काळातच सौ. सारिका हांगे हिने आपल्या लहानग्या बाळासह आई-वडिलाकडे येळी या गावी आली. हे तिचं येणे दुर्दैवी ठरलं…
याच काळात चुलतभाऊ नामदेव व वडील रामकिसन बडे यांच्यात जमीनीच्या कारणातून वाद सुरू होते. या वादात नेहमीच तेथेच दिली असलेली चुलत बहीण आपल्या मुलासह आपला भाऊ नामदेव यांच्या भाविकीच्या भांडणात मदतीला येत असत. या वादाच्या काळातच सौ सारिका ही येळी तेथे आपल्या लहानग्या बाळासह आई-वडिलाकडे आली होती. या दरम्यान पुन्हा मोठी चुलती हिच्याबरोबर आई लताबाईचे शेतीच्या वादातून भांडण झाले. या भांडणात चुलतभाऊ नामदेव याच्या बहिणीने भाग घेतला. यामुळेच तेथे उपस्थितीत असणारे सौ.सारिका व सौ. कविता या दोघी बहिणींनीही त्या वादात सहभाग घेतला. परंतु यावेळी तेथे उपस्थित असणारा चुलत बहीणीचा मुलगा हाही आई लताबाई व मयत सौ.सारिका, सौ.कविता यांच्यावर धावून गेला होता. पण या घटनेचा राग चुलत भाऊ नामदेव बडे व भाचा अतुल फुंदे यांच्या डोक्यात होता. या काळातच रविवारी दि.२८ मे २०२३ च्या मध्यरात्री उन्हाळ्याचे दिवस असल्याने चुलता रामकिसन कारभारी बडे हे घरासमोरील पडवीत आपल्या पत्नीसह मुली व त्याचे लहानग्या बाळासह झोपलेले होते. या दरम्यान क्रुरकर्मा चुलतभाऊ नामदेव बडे व भाचा अतुल फुंदे यांनी आई लताबाई, सौ सारिका यांच्या डोक्यात निर्दयीपणे घाव घातले, तर सौ. कविता हिच्या पायावर घाव घातला. या घटनेत सौ सारिका हीच्या डोक्याला गंभीर जखमी झाल्याने ती मयत झाली. सुदैवाने आई लताबाई व बहिण कविता या दोघी वाचल्या. पण ही सर्व घटना सौ कविता हीने पाहिल्याने चुलत भाऊ नामदेव व त्याच्या भाचा अतुल या दोघांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर दोघा आरोपींना तेवढ्याच तत्परतेने पाथर्डी पोलिसांनी अटक केली. या सारिका हांगे खून प्रकरणी औरंगाबाद न्यायालय खंडपीठाने अटीशर्तीवर यात येळी गावात व तेथील परिसरात येण्यावर बंदी व घटनेतील फिर्यादी, या संबंधीतांवर दमदाटी अथवा दबाव आणून नये, या अटीशर्तीवर आरोपी चुलतभाऊ नामदेव बडे याला जामीन मंजूर केला आहे. या खटल्याची सुनावणी येत्या दि.२३ नोव्हेंबर २०२३ होणार आहे.
या घटनेनंतर अनेकांच्या संतापजनक प्रतिक्रिया आल्या आहेत. घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अनेकांनी केली आहे. पण यात पोलिस तपासाबाबत किती गांभीर्य घेतात, यावरच सर्व अवलंबून… असो…