पाथर्डी तालुक्यातील दरोड्यासह अनेक गुन्हे उघडकीस, ६ जण अटक; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी

पाथर्डी तालुक्यातील दरोड्यासह अनेक गुन्हे उघडकीस, ६ जण अटक; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पाथर्डी तालुक्यातील नागरिकांची नाराजी होती. त्यानुषंगाने पाथर्डी पोलिसांबद्दल एसपी राकेश ओला यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या होत्या. पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास होऊन गुन्हे उघडकीस येत नव्हते. याबाबत नगर रिपोर्टर व संग्राम सत्तेचा’ या वृत्तसेवा संस्थेने वेळोवेळी याबाबतीत वृत्त प्रसिद्ध केले. याची नगर एसपी राकेश ओला यांनी तातडीने दखल घेऊन पाथर्डी तालुक्यातील दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नगर एलसीबीला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे टाकळी मानूर दरोडा प्रकरणी ६ आरोपींना पोलिसांनी पकडले असून, त्यांनी ७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गुन्ह्यात १३ जणांचा समावेश आहे. ही महत्वपूर्ण कामगिरी नगर एलसीबी टिम’ने केली आहे. तालुक्यातील अनेक दाखल गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता नगर पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आजिनाथ भागीनाथ पवार (वय 26, रा. आर्वी, ता. शिरुर कासार, जि. बीड), गणेश रामनाथ पवार (वय 25, रा. ब्रम्हगव्हाण, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), विनोद बबन बर्डे (वय 27, रा. वारणी, ता. शिरुर कासार, जि. बीड), अविनाश काशिनाथ मेहेत्रे (वय 28, रा. कुळधरण रोड, कर्जत, ता. कर्जत), अमोल सुभाष मंजुळे (वय 23, रा. वडगांव पिंपरी, ता. कर्जत) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक
प्रशांत खैरे व शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, पोउपनि तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोहर शेजवळ व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, विशाल दळवी, पंकज व्यवहारे, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, संदीप चव्हाण, राहुल सोळुंके, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, रोहित मिसाळ, अमृत आढाव, अमोल कोतकर जालिंदर माने, रविंद्र घुगांसे, मच्छिंद्र बर्डे, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, भरत बुधवंत व अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कुटूबिंयासह घरात झोपलेले असताना २० ते २५ वयाचे अनोळखी ८-९ जणांनी घरात प्रवेश करुन फिर्यादी व त्यांचे कुटूबियांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन, सत्तुरचा धाक दाखवून घरातील ६६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख व विविध कंपनीचे मोबाईल फोन चोरुन नेले, या बाबासाहेब उत्तम ढाकणे (वय ७४, रा. अंबिका नगर, टाकळी मानूर, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५४/२०२४ भादविक ३९५,३९७,५०४ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन एसपी श्री ओला यांनी नगर एलसीबीला तपासाच्या सूचना देऊन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबी पोनि श्री. आहेर यांनी घटना ठिकाणास भेट देऊन माहिती घेतली होती. यानंतर एलसीबीचे ३ विशेष टिम तयार करुन घटना ठिकाणी भेट दिली, आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत तसेच पाथर्डी परिसर व लगतचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार पोलीस ठाण्याला अशा प्रकारे दाखल असलेल्या गुन्हा ठिकाणी जाऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन तसेच गेले मालाबाबत माहिती घेता शिरुर कासार येथील गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईलचे व सदर घटना ठिकाणचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करत असतांना पोनि श्री. आहेर यांना दि.१६ मार्च २०२४ रोजी गुन्हा हा आरोपी नामे संदीप बबन बर्डे (रा. वारणी, जि. बीड) याने व त्याचे इतर १० ते १२ साथीदारांनी केला आहे. ते पुन्हा कोठेतरी चोरी करण्यासाठी त्याच्याकडील पांढरे रंगाची पिकअप गाडीने पाथर्डी येथून मोहटादेवी रोडने जाणार आहेत, आता गेल्यास मिळून येईल अशी माहिती मिळाल्याने पोनि श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती एलसीबी टिमला दिली. एलसीबी टिम’ने लागलीच पाथर्डी ते मोहटादेवी जाणारे रोडवर कारेगांव फाटा, पाथर्डी येथे जाऊन सापळा रचून थांबलेले असताना माहितीप्रमाणे पिकअप वाहन येताना दिसले. खात्री होताच पथकाने ताब्यातील वाहने रोडला आडवी लावली असता पिकअप चालकाने त्याचे ताब्यातील गाडी थोड्या अंतरावर थांबविली. त्यावेळी पिकगाडीचे पाठीमागील हौदात बसलेल्या इसमांपैकी ३ जण गाडीतून उडी मारुन पळून गेले. उर्वरित पोलीसांनी पिकअप गाडीचे केबिनमध्ये असलेल्या तिघांना व पाठीमागील हौदामध्ये बसलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे सांगितली.
त्यांना पळून गेलेल्या इसमांचे नांव गांव विचारता इसम नामे विनोद बर्डे याने पळून गेलेल्यांची नावे संदीप बबन बर्डे (रा. शिरुर कासार, जि. बीड), पप्पु उर्फ राहुल दिलीप येवले (रा. शिरुर कासार, जि. बीड), अक्षय सुरेश पवार (रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार बाबासाहेब भवर (रा. वडगांव, ता. पाथर्डी), विशाल जगन्नाथ मंजुळे (रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत), भारत फुलमाळी (रा. वारणी, ता. शिरुर कासार, जि. बीड), विकास उर्फ हरी पोपट सुळ (रा. वडगांव तनपुरा, ता. कर्जत) याच्यासोबत गुन्हा केल्याची सांगून साथीदार तुकाराम धोंडीबा पवार (रा. पाथर्डी) हा आम्हाला चोरी करणे करीता अगोदर बोलावून घेऊन कोठे चोरी करायची ते ठिकाण दाखवतो. त्यानंतर आम्ही रात्रीचे वेळी जाऊन चोरी करतो. चोरी केलेले सोने तुकाराम पवार याच्याकडे दिल्यानंतर तो काही दिवसांनी त्याचे पैसे देतो असे सांगितल्याने त्याचा शोध घेता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपींकडे टोळीने कोठे कोठे व किती गुन्हे केले याबाबत अधिक सखोल व बारकाईने विचारपुस करता वरील टोळीने मिळून खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे सांगितल्याने एकुण ७ गुन्हे उघडकिस आलेले आहेत.
याप्रमाणे पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
१)पाथर्डी 254/2024 भादवि कलम 395, 397, 504, २) पाथर्डी 253/2024 भादवि कलम 379
३) पाथर्डी 66/2024 भादवि कलम 392, 34 ४) पाथर्डी 37/2024 भादवि कलम 392, 34 ५) अमळनेर, जि. बीड 13/2024 भादवि कलम 380 ६) शिरुर कासार जि. बीड 29/2024 भादवि कलम 457, 38 ७) पाथर्डी 189/2024 भादवि कलम 394, 34, 427
पकडण्यात आलेल्यांकडून 28 ग्रॅम वजनाचे 1,68,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 29,400/- रुपये रोख, 20,000/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन, 6,00,000/- रुपये किंमतीची पिकअप व 200/- रुपये किंमतीची हत्यारे असा एकुण 8,17,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने ताब्यातील आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 254/24 भादविक 395, 397, 504 या गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!