पाथर्डी, अहमदनगर परिसरात घरफोडी करणा-यास पकडले ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : पाथर्डी व अहमदनगर परिसरात दिवसा घरफोडी करणा-या आरोपीस मुद्देमालासह पकडले आहे. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल करण्यात ‘अहमदनगर एलसीबी’ यश आले आहे. रोहित नादर चव्हाण (वय २१, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव असून दुसरा हा अल्पवयीन आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, सफौ भाऊसाहेब काळे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, पोकॉ भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड व चापोहेकॉ उमाकांत गावडे यांच्या टिमने ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२७ सप्टेंबर २०२३ रोजी घराबाहेर गेले असताना अनोळखींनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील ७० हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र व रोख रक्कम चोरुन नेली., या सोमनाथ म्हातारदेव घुले ( रा. शेकटे, ता. पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गु.र.नं. १००६/२३ भादविक ४५४, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा घरफोडीची घटना घडल्यानंतर एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना टिम नेमून ना उघड घरफोडीचे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकिस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार एलसीबी टिम’ने चिचोंडी पाटील (ता. नगर) परिसरात रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना काही संशयीत इसम पोलीस पथकास पाहून पळू लागल्याने पोलिसांनी संशयीतांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे रोहित नादर चव्हाण (वय २१ , रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे नाव सांगितले तर दुसरा अल्पवयीन आहे. त्यांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. त्याबाबत विचारपुस करता आरोपी रोहित चव्हाण याने अल्पवयीन साथीदारासह शेकटे, पाथर्डी व सावेडी नाका, अहमदनगर येथे बंद घराचे कुलूप तोडुन चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींनी दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने पथकाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता २ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती प्राप्त झाली आहे.