सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी शहरातील कसबा विभागातील ब्राह्मण गल्ली येथील श्री चिंतामणी गणेश मंदिराचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला.
काशी येथील वेदवेदांगचक्रवर्ती प.पू. गणेश्वरशास्त्री द्राविड सदर प्रतिष्ठापनेसाठी उपस्थित होते. प्रतिष्ठापनेनंतर श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते सदर श्री गणेश यागासाठी पाथर्डी व तालुक्यातील सुमारे ३०० दांपत्यांनी भाग घेतला. गणेशाच्या प्रतिष्ठापनेबरोबर मंदिराचे पावित्र्य राखणे, नित्योपचार पूजा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प.पू. द्राविड गुरुजींनी व्यक्त केलं. कलियुगामध्ये श्री चिंतामणी उपासना ही सद्य फलदायी असून सर्व पाथर्डी करांनी श्री चिंतामणींचं पावित्र्य योग्य रीतीने जपून मंदिराचे संरक्षण व संवर्धन करावं.. ऋग्वेद व सामवेद पारायणाने मंदिरात निर्माण झालेल्या पवित्र लहरींचे जतन करावं. योग्य अंतरावरून दर्शन घेण्याची ताकद मनुष्याला सर्वांगीण सुखप्राप्ती करून देते असे प्रतिपादन समर्थ भक्त प.पू. मंदारबुवा रामदासी यांनी केले.
या सोहळ्याच्या निमित्ताने वेदपारायण, प्रवचन,हरिपाठ,कीर्तन व अन्नदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. तारकेश्वरगडाचे महंत प.पू.ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री,सद्गुरु जोग महाराज संस्थान आखेगांवचे प.पू.ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के,प.पू.ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर, समर्थभक्त प.पू.मंदारबुवा रामदासी आदी महात्म्यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. सोनूशेठ गुगळे,डॉ सौ.ज्योती देशमुख, विठ्ठल हंपे, बाळासाहेब भोसले, विश्वजित गुगळे, रविंद्र पाथरकर, डॉ.विद्या व डॉ.ज्ञानेश्वर दराडे,सौ.सुजाता,डॉ. दिगंबर भराट, सौ.स्मिता,डॉ.जगदीश मुने,सौ.मंजूषा ,डॉ.ह्रषीकेश कुलकर्णी, डॉ.आरती, डॉ.दीपक जायभाये, डॉ.वैशाली, डॉ.विनोद गर्जे, डॉ.सुवर्णा,डॉ.शिरीष जोशी, सौ.वैशाली , गिरीश जातेगांवकर, सौ.वैशाली, रविंद्र कुलकर्णी,शरद पाथरकर, हरिओम रासने,मधुकर आघाव,गजानन देशमुख,लक्ष्मण देशमुख,ह्रषीकेश देशमुख,संजय लाड,ईश्वर जावळे,नीलेश ईजारे,संतोष नि-हाळी,बाळकृष्ण जोशी,सचिन देशपांडे,आनंद मर्दाने आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात नगर, पुणे, जालना,नागपूर,संभाजीनगर,पाथर्डी व परिसरातील हजारो गणेशभक्तांनी हजेरी लावली. गणेश तात्या सोनटक्के,रमेश काटे सर,सचिन देशपांडे, दहावीची १९९०ची बॅच, भोसले परिवार,चंद्रकांत गोरे आजिनाथ कर्डिले,आपटे व देशमुख परिवार, विश्वजीत गुगळे,जगदीश मुनी श्रीरामशेठ परतानी,डॉ. दराडे आदीनी अन्नदानात सहभाग नोंदवला तर महाप्रसादाची पंगत श्री रविदादा पाथरकर व सुभाष शेठ चोरडिया यांनी दिली. सलग चार दिवस चाललेल्या अन्नदान महायज्ञाचा लाभ सुमारे साडेपाच हजार भाविकांनी घेतला असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक, श्री.चिंतामणी गणेश मंदिर ट्रस्टचे सचिव डॉ.श्रीधर देशमुख यांनी दिली.