गुन्हेगारांना पोलीसांचा अभय खिसेकापू दरोडेखोर, सराईत गुन्हेगारांची दहशत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः पाथर्डीमध्ये पोलीसांची थेट गुन्हेगारांशी हातमिळवणी आहे. रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार थेट पोलीस स्टेशनमध्ये तडजोडी करतात. सराईत गुन्हेगारांसह, खिसेकापू, दरोडेखोर, तडीपार असलेले व तडीपारीचा प्रस्ताव असलेले गुन्हेगारांचे पोलीसांशी उठबस वाढली आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्यात पोलीसांचे भय गुन्हेगारांना राहीले नाही. नागरीकांची सुरक्षा वार्यावर आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची त्वरीत खातेनिहाय चौकशी करुन बदली करावी अशी मागणी शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णूपंत ढाकणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
तालुकाध्यक्ष विष्णूपंत ढाकणे यांनी गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक यांना पाठवलेल्या निवेदनात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या कामकाजाबाबत गंभीर आरोप केले आहेत. पोलीस निरीक्षकांचे सराईत गुन्हेगाराशी आथिर्र्क हितसंबध आहेत. चोरी, दरोडा, खंडणी, जागेचे अतिक्रमन, बलात्कार, हनीट्रॅप, पीक पॉकेटींग अशा गंभीर गुन्हयाला पोलीसांचे आर्थिक देवाण घेवाणीतून अभय आहे. मागील दोन दिवसापुर्वी माझ्यावर खोटा अॅट्रॉसीटीचा गुन्हा आर्थीक देवाण घेवाण करुन पोलीस निरीक्षकांनी दाखल केलेला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे यांचे गाव आष्टी तालुक्यातील असून त्यांचे व तेथील स्थानीक आमदारांचे राजकीय संबंध आहेत. शिरुर येथील कुप्रसिध्द गुन्हेगार सतीष भोसल उर्फ खोक्या याचे हितसंबंध आष्टीच्या स्थानीक आमदारांशी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सतीष भोसले उर्फ खोक्या याचे माझ्यावर दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फिर्यादीचे जवळचे नातेसंबध आहेत. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फिर्यादी ही सराईत आरोपी असून तीचा ब्लॅकमेलिंग करणे हा व्यावसाय बनला आहे. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा पुर्वगृह दूषित हेतूने मला 1 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्यामुळे मी गुन्हा दाखल केल्यानंतर घडला आहे.
पाथर्डीत पोलीस ठाण्यातील कर्मचार्यावर हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न अॅट्रासिटीची फिर्याद दाखल करणार्या महिलेने काही महिन्यापूर्वी केला होता. पोलीस निरीक्षकाने मध्यस्थी करुन तडजोडीने पोलीस कर्मचार्याने नोकरीचा प्रश्न आहे, असा सांगून मिटवायला भाग पाडले होते. या प्रकरणात मोठी आर्थिक तडजोड पोलीस निरीक्षकांनी घडवून आणली आहे. याचा तपास स्वतंत्र पोलीस पथकाकडे देण्यात यावा, अशी मागणी आहे. श्री ढाकणे यांनी केली आहे.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखले केलेल्या फिर्यादीशी पोलीस निरीक्षकांचे आर्थिक हितसंबध असल्याचे निदर्शनास आले आहे. मला 1 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याची फिर्याद दाखल करणार्या ठाणे अंमलदार यांना गुन्हा दाखल करुन घेतलेने त्यांना शॉकॉज (कारणे दाखवा) नोटीस बजावली असल्याचे देखील श्री ढाकणे यांनी म्हटले आहे. पोलीस निरीक्षकांचे सर्व वर्तन हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारेे आहे. त्यामुळे लवकरच याबाबत शहर व तालुका बंद ठेवून आंदोलन केले जाईल असे श्री ढाकणे यांनी सांगितले आहे.