पाथर्डीत गावठी कट्टा विक्रीस घेऊन आलेला जेरबंद ; अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : पाथर्डी येथे गावठी कट्टा विक्री करण्याचे उद्देशाने आलेला आरोपीस पकडण्यात अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमला यश आले आहे. या कारवाईत ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे (वय २९, रा. जवळा, ता.जामखेड, जि. अहिल्यानगर), संतोष उर्फ विशाल बाळासाहेब शिंदे (वय २६, रा.कसबापेठ, पाथर्डी जि. अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, मनोज लातुरकर, प्रशांत राठोड व महादेव भांड आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणा-यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत देण्यात आलेल्या आदेशानुसार दि.२८ मार्च २०२५ रोजी पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणा-यांची माहिती काढत असताना क्राईम ब्रॅंच टीमला माहिती मिळाली की, ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे (रा.जवळा, ता.जामखेड) हा संतोष बाळासाहेब शिंदे (रा.पाथर्डी) यास गावठी कट्टा विक्री करण्यासाठी पाथर्डी ते कोरडगाव जाणारे रोडवरील स्मनाशभूमी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. क्राईम ब्रॅंच टीमने पंचासमक्ष पाथर्डी ते कोरडगाव रोडवरील स्मशानभुमीजवळ सापळा रचून ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे, संतोष उर्फ विशाल बाळासाहेब शिंदे यांना ताब्यात घेतले. आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे याच्याकडून ३१ हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
ताब्यातील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे याच्याकडे मिळालेल्या अगिशस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्याने अग्नीशस्त्र व काडतुस हे उज्जैन मध्यप्रदेश येथून खरेदी केले आहे. ते संतोष उर्फ विशाल बाळासाहेब शिंदे यास विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती दिली. आरोपीविरूध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात गुरनं ३४०/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाथर्डी पोलीस हे करीत आहे.