पाथर्डीत ईव्हीएमविरोधात निर्दशने: प्रतित्माक ईव्हीएम मशिनचे दहन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork ((video news)
पाथर्डी: पाथर्डीत आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ॲड प्रतापकाका ढाकणेंच्या नेतृत्वाखाली प्रतित्माक ईव्हीएम मशिनचे पाथर्डी तहसील कार्यालयासमोर दहन करुन निर्दशने केली. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या माध्यमातून मतदानाची घोटाळाबाजा केलेल्या निकालाविरोधात घोषणा करत झालेल्या प्रकाराचा निषेध केला.
यावेळी राणीताई लंके, योगिता राजळे, सविता भापकर, सुभाष केकाण, बंडू बोरुडे, राजेंद्र दौंड, नाशिर शेख, सचिन नागपुरे, वजीर पठाण, हरिष भारदे, डॉ.राजेंद्र खेडकर, आदींसह शेवगाव पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा शिवसेना, काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.