सुभाष केकाण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः मस्साजोग घटना, शिरुरच्या खोक्याच्या नातेवाईकांविरोधात खंडणीचा गुन्हा, अल्पवयीन टोळ्यांना सराईत गुन्हेगारांचा आश्रय अशा एक ना एक नवीन घटना समोर येत असतांनाच आता वाहन आडवणे, त्याच्याच वाहनाना कट मारणे व त्यांच्याकडून भरपाईच्या नावाखाली भरमसाठ खडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत. रेकॉर्डवर असलेले सराईत गुन्हेगार व त्याच्या टोळ्या राजरोस नागरीकांना लुटत आहेत. या गुन्हेगाराचा बिमोड करण्यासाठी पाथर्डीची पोलीस अॅक्शन मोडमध्ये कधी येणार याकडे नागरीकाचे लक्ष लागले आहे.
पाथडींची ओळख जसा साधू संत, व नाथांचा तालुका म्हणून असली तरी आता नव्याने राज्याला गुन्हेगार पुरवनारा तालुका म्हणून ओळख होवू पहात आहे. मागील पाच वर्षाचे गुन्हेगारी रेकॉर्डचा अभ्यास केला तर राज्याच्या विविध भागात गुन्हे केलेल्या घटनांमध्ये पाथर्डीचे गुन्हेगार निष्पन्न झाले आहेत. त्यामुळेच शहर व तालुक्यात गुन्हेगाराची प्रचंड दहशत निर्माण झाली असून सामान्य नागरीकांना आपला जिब मुठीत धरुन जगावे लागत आहे,
पाथर्डीचे खिसेकापू सपुर्ण राज्यात परिचीत आहेत तसेच गुन्हेगारांच्या टोळ्यात पाथर्डीची समावेश आहे. गावठी कट्टे, दरोडे, चोर्या, खंडणी असे गभीर प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार पाथर्डीतील आहेत त्यातच गुन्हेगारांना छोट्या मोठ्या लोकप्रतिनिधीकडून मिळणारे पाठबळ, त्यातूनच राजकीय पक्षाची व लोकप्रतिनिधींशी होणारी उठबस यातून गुन्हेगारांना प्रतिष्ठा मिळत आहे. राजकीय वरदहस्त मिळालेने गुन्हेगाराचे मनोबल आणि मनोधैर्य वाढून गुन्हेगारी फोफावत आहे.
गुन्हेगारांना राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडून मिळणारी प्रतिष्ठा यामुळे अल्पवयीन मुले देखील गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षीत झाली आहेत. त्यातूनच अल्पवयीन गुन्हेगाराच्या टोळ्या पाथर्डीत निर्माण झाल्या आहेत
राजकीय पक्षांना निवडणूकीसाठी लागनारी गुडगिरी पोसण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी गुन्हेगारांना आश्रय देत आहेत. त्यातूनच गुन्हेगाराची मजल थेट पक्षाच्या प्रमुखांना नडवण्या पर्यंत चालली आहे. गुन्हेगारांना जात नसते, विचार, नसतो, पक्ष नसतो मात्र सोवीसाठी कधी या पक्षाच्या तर कधी त्या पक्षाच्या वलचणीचा आश्रय गुन्हेगार घेतात. अन त्यातूनच आपले गुन्हेगारी प्रस्थ वाढवतात. याच राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलीस आपले कायद्याचे दोर ढिले सोडतात. तर कधी आर्थीक हितसंबध जोपासून आपले हात ओले करून घेतात. त्यामुळे गुन्हेगाराना राजकीय पुढारी, छोटे मोठे लोकप्रतिनिधी व पोलीस आपल्याच खिशातील वाटल्याने काहीही करा आपले काहीच बिघडत नाही अशी गुन्हेगारांची मानसीकता बनली आहे
पाथर्डी गुन्हेगाराचे शहर झाले आहे. भविष्यात मस्साजोग सारख्या, शिरुरच्या खोक्याच्या गैंगसारख्या नव्या टोळ्या व सराईत गुन्हेगार निर्माण झाले तर नवल बाटता कामा नये. पाथर्डीचे पोलीस हे स्थानीक व आसपासच्या तालुक्यातील असल्याने कायद्याच्या अमंलबजावणी ऐवजी तडजोडीने व क्रॉस गुन्हे दाखल करुन आर्थीक हितसंबध जोपासताना दिसते आहे. यात वरीष्ठांची आर्थीक माडवली करुन पोलीस स्टेशन मध्ये दररोज आर्थीक तडजोडी होत आहेत.
पाथर्डी पोलीस ठाण्यात अपुर्या कर्मचार्याचा विषय कायम चर्चीला जात असला तरी हा प्रश्न एकून राज्याचा आहे. पोलीसाचे अपुरे मनुष्यबळ हा कायदा व सुव्यवस्था राबवण्यासाठी मुद्दा ठरु शकत नाही मागील 20 वर्षाच्या तुलनेत आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व किमान 6 ते 7 पोलीस उपनिरीक्षक इतकी अधिकार्यार्यांची पदे कार्यरत आहेत. सरकारी वाहन, तात्रीक तपासाचे मार्गदर्शन, संगणक व मोबाईलचा वापर करुन तात्रीक पातळीवर तपास आणी प्रभावी पोलीसींग करुन गुन्हेगारावर वचक निर्माण करु शकतात. फक्त पोलीस अधिकार्याची मानसीकता व वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी काम करणार्या अधिकार्याना मानसीक बळ देण्याची गरज आहे.