पाणी पिण्यास गेलेल्या युवकाचा कालव्यात पडून मृत्यू

पाणी प्यायला गेलेल्या युवकाचा कालव्यात पडून मृत्यू
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर पाणी प्यायला गेलेल्या युवकाचा कांबी ता शेवगाव येथे पाय घसरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हातगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की,हातगाव येथील अण्णा गायकवाड (वय २२ ) हा युवक शनिवारी ( दि.२० एप्रिल २०२४) शेतमजुरीच्या कामासाठी शेजारच्या कांबी गावात गेला होता‌.दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जवळून वाहत असलेल्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर पाणी पिण्यासाठी गेला असता,पाय घसरून पाण्यात पडला व पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला, सोबतच्या मजुरांना माहिती मिळताच त्यांनी अण्णा गायकवाड ची शोधाशोध केली परंतु अण्णा चा शोध लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच हातगावसह कांबी मधील ग्रामस्थांनी अण्णा गायकवाडसाठी शोधमोहीम राबवली परंतु दुर्दैवाने रविवारी (दि.२१ एप्रिल) रोजी दुपारी २ वाजता च्या दरम्यान मालेगाव परिसरात अण्णा गायकवाडचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलिस दुरक्षेत्राचे श्री नानासाहेब गर्जे साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित झाले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शेवगाव येथे पाठविण्यात आला आहे.
मयत अण्णा गायकवाड यांच्या पाठीमागे पत्नी, तीन महिन्याची एक मुलगी व दोन वर्षाचा मुलगा असून अण्णा व त्याची पत्नी शेतमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते.
दरम्यान जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याचे कॉंक्रेटीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, ज्या ठिकाणी घटना घडली. त्या ठिकाणी कॉंक्रेटीकरणासाठीचा प्लॅस्टिक पेपरचे अच्छादन केलेले होते. त्या प्लॅस्टिक पेपरमुळेच पाय घसरून अण्णा गायकवाड कॅनलमध्ये पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला, संबंधित ठेकेदाराने सुरक्षेविषयी काळजी न घेतल्याने आमचा माणूस जिवाला मुकला असल्याचा आरोप अण्णा गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हातगावचे सरपंच अरुण मातंग यांनी देखील सदरील हकीकत शेवगाव चे तहसीलदार श्री सांगडे यांना दिली. हे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील कुटूंब असून या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

संकलन : निलेश ढाकणे, शेवगाव 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!