पागोरी पिंपळगांव ग्रामस्थांचे पाथर्डी तहसीलसमोर उपोषण

पागोरी पिंपळगांव ग्रामस्थांचे पाथर्डी तहसील कार्यालयासमोर उपोषण
👉पिण्यासाठी, पशुंना टॅंकरने पाणीपुरवठा करावा ग्रामस्थांची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगांव येथे गेल्या पंधरा दिवसापासून जीवन प्राधिकरण नळ योजनेचा पाणी पुरवठा खंडीत झाली आहे. या‌ परिस्थितीत मंजूर टॅंकर देखील गावात येत नसल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पाण्याची मोठी समस्या जिल्हा प्रशासनाने तातडीने सोडविण्यात यावी, या मागणीसाठी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे, सरपंच राजेंद्र दराडे, प्रा.सुनील पाखरे व युवानेते संपतराव दराडे यांच्या नेतृत्वाखाली पागोरी पिंपळगांव ग्रामस्थांसह विशेषात: तालुक्यातील अनेक नागरिकांनी वतीने उपोषण करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांला पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीत पशुधनाला देखील पाणी नसल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे जीवन प्राधीकरणची खंडीत नळ योजना सुरळीत करून द्यावी. २०११ च्या जनगणनेनुसार पाण्याच्या टॅकरच्या खेपा न देता आजमितीच्या जनगणनेनुसार टॅकरच्या खेपा वाढवून द्याव्यात. जोपर्यंत ठोस कारवाई व लेखी पत्र मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून उठत नाही अशी, भूमिका ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे सरपंच राजेंद्र दराडे यांनी घेतली.
त्यानंतर मार्केट कमिटीचे संचालक अजय रक्ताटे यांनी उपोषणकर्ते आणि पाथर्डी प्रांतधिकारी यांच्याशी सवांद करुन दिला . प्रांतधिकारी यांनी तुमचा प्रश्न उद्याच्या उद्या मार्गी लावतो, असे फोनवर आश्वासन दिले. परंतु उपोषणकर्त्यांनी आम्हाला लेखी पाहिजे असे से सांगिल्यानंतर प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाच्या वतीने श्री धायतडक व श्री कासार यांनी उपोषणकर्त्यास लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी आलीम पटेल, मन्सुर पटेल, शाहामीर शेख, धबुभाई शेख, आजीनाथ भगवान दराडे, कल्पेश घनवट, संभाजी पाचरणे, बापुराव जावळे, सुखदेव नवगिरे,निवृती लाला नागरे, प्रल्हाद रामराव दराडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!