पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासाच्या आत शोध ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासाच्या आत शोध ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : येथील एमआयडीसी परिसरातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा २४ तासाच्या आत शोध घेऊन पालकांचे स्वाधीन करण्याची महत्वपूर्ण कामगिरी एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोसई पोपट टिक्कल, पोसई दिपक पाठक, पोसई राजेंद्र गायकवाड, पोना विष्णू भागवत, पोकॉ नवनाथ दहिफळे पोका किशोर जाधव मपोकॉ सोनिया पारधे आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी (दि. २७ सप्टेंबर २०२३) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चेतना कॉलनी नवनागापूर येथून त्यांची अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञाताने फुस लावून पळवून नेले, या देण्यात आलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरनंबर ८९४ / २०२३ भादवि ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली की, अल्पवयीन मुलगी हि शेंडी बायपास रोड एमआयडीसी अहमदनगर येथे आहे. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याची एक टिम तयार करुन माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन मुलीस तिच्या आईवडील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोसई टिक्कल हे करीत आहेत.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!