👉गोरगरिबांसाठी काँग्रेसचे किराणा टूलकिट
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव- पर्यावरण दिना व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगांव तालुका काँग्रेसच्या वतीने वेगवेगळे उपक्रम करण्यात आले. यावेळी शेवगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या हस्ते शहरातील गरजू अपंग महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
आमदार पटोले यांचा वाढदिवस व पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे यांनी ५ हजार सीड बॉल तयार केले. तहसीलदार यांच्या कार्यालयातील पुरवठा निरीक्षक श्री चिंतामणी साहेब यांच्याकडे सीड बॉल सुपूर्द करण्यात आले असून हे ‘सीड बॉल तहसीलदारांमार्फत वन विभागाकडे सुपूर्द करण्यात यावे’ अशी विनंती शेवगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयास करण्यात आली.
यावेळी शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्यासह तालुका युवकचे अध्यक्ष बब्रु वडघने, शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश भैय्या क्षीरसागर, ज्येष्ठ पत्रकार निजाम भाई पटेल, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कल्पना ताई खंडागळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, शिवाजी वडघने आदी उपस्थित होते.