संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नाशिक –महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार दि.११ जानेवारी २०२३ रोजी सात उमेदवारांनी १० नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आत्तापर्यंत १३ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा. प्र.) रमेश काळे यांनी दिली आहे.
बुधवारी (दि.११) नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये सुरेश भिमराव पवार, नाशिक यांनी अपक्ष व नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी या दोन पक्षातून अर्ज सादर केले आहे. अन्सारी रईस अहमद अब्दुल कादिर, धुळे व सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. रतन कचरु बनसोडे, नाशिक यानी वंचित बहूजन आघाडी पक्षातून तर शुभांगी भास्कर पाटील, धुळे भारतीय जनता पक्षातून अर्ज सादर केला आहे. ईश्वर उखा पाटील, धुळे यांनी अपक्ष व आम आदमी पार्टी या पक्षातून दोन अर्ज सादर केले आहे. सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपूर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे.
दि.१० व ११ जानेवारी,२०२३ या दोन दिवसात १३ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले आहे.